
नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादनाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी रोगमुक्त, दर्जेदार रोपांची निर्मिती आणि शास्त्रीय शेती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. योग्य संशोधन, गुणवत्तापूर्ण रोपे आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाल्यास संत्रा हा विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थानात ‘क्लीन प्लांट’ (रोगमुक्त रोपे) उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत ते शनिवारी बोलत होते. या वेळी संस्थेचे संचालक दिलीप कुमार घोष, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ए. के. दास, सुधीर दिवे यांच्यासह आसाम, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरसह १२ राज्यांतील अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, विदर्भातील शेतीसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, माती परीक्षण आणि वैज्ञानिक शेती अत्यावश्यक आहे. मात्र, कृषी विकासाचा खरा पाया रोगमुक्त आणि गुणवत्तापूर्ण रोपांमध्ये आहे. संशोधन संस्थांनी विदर्भाच्या गरजेनुसार संशोधन करून त्याचे तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, सरकारी संस्थांनी दर्जेदार बियाणे व रोगमुक्त रोपे तयार करून शेतकरी आणि रोपवाटिका चालकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन द्यावे. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होईल आणि संत्रा उत्पादकांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत मिळेल.
यावेळी गडकरी यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील रोपवाटिकांबाबतच्या कायद्यात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांचाही उल्लेख करण्यात आला. या सुधारणांमुळे दर्जेदार रोपनिर्मितीला चालना मिळून संत्रा उत्पादन क्षेत्र अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




