नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामामुळे प्रवाशांना तब्बल ५२ दिवस काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आजपासून (८ सप्टेंबर २०२५) ते २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संपूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय कॉनकोर्सच्या फाउंडेशन कामासाठी घेण्यात आला आहे.
प्लॅटफॉर्म बदल-
प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून सुटणाऱ्या एकूण १८ गाड्या इतर प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या गाड्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे –
२२१२६ अमृतसर–नागपूर एसी एक्सप्रेस आणि २२१२५ नागपूर–अमृतसर एसी एक्सप्रेस या गाड्या आता प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून धावतील.
११२०१ नागपूर–शहडोल एक्सप्रेस देखील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून सुटेल.
२०९११ इंदूर–नागपूर एक्सप्रेस आणि २०९१२ नागपूर–इंदूर एक्सप्रेस यांना प्लॅटफॉर्म क्रमांक ६/७ वर हलवण्यात आले आहे.
मेमू सेवा-
* आमला–नागपूर/नागपूर–आमला (६११२०, ६१११७, ६१११८, ६१११९)
* नागपूर–वर्धा/वर्धा–नागपूर (६११०९, ६१११०)
या सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटतील.
वंदे भारत एक्सप्रेस-
पुणे, जयपूर, अहमदाबाद–हावडा आणि सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १, ३ आणि ६ वरून धावतील.
शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजिनेशन-
०११४० मडगाव–नागपूर एक्सप्रेस अजनी येथेच थांबवली जाणार असून, हा बदल १५ फेऱ्यांसाठी लागू राहील.
०११३९ नागपूर–मडगाव एक्सप्रेस अजनीहूनच सुटेल, आणि हा बदल देखील १५ फेऱ्यांसाठी असेल.
मेमू गाड्यांचा नियमन-
ऑपरेशनल कारणास्तव मेमू गाड्या (६११२०, ६१११७, ६१११८, ६१११९) या १० ते २० मिनिटे उशिराने धावू शकतात.
रेल्वे प्रशासनाने या असुविधेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि प्रवाशांना सहकार्याची विनंती केली आहे. तसेच, प्रवाशांनी गाडींचे संचालन आणि प्लॅटफॉर्ममध्ये झालेले बदल याबाबत अद्ययावत माहिती घेण्यासाठी NTES अॅप किंवा रेल्वे चौकशी पोर्टल (enquiry.indianrail.gov.in) चा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.