Published On : Mon, Sep 8th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पीओपी मूर्तींची वाढ; २०२५ मध्ये ९४५६ मूर्तींचं विसर्जन

गेल्या वर्षाच्या तुलनेत ३.०१% वाढ

नागपूर : पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवरील बंदी उठवल्यानंतर नागपुरात या मूर्तींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा रविवारीपर्यंत एकूण १,६१,५२५ गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. त्यापैकी ९,४५६ मूर्ती या पीओपीच्या होत्या. हे एकूण विसर्जनाच्या ५.८५ टक्के इतकं प्रमाण आहे.

२०२४ मध्ये हे प्रमाण केवळ २.८४ टक्के होतं. यंदा जवळपास ३.०१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, मागील काही वर्षांच्या तुलनेत पीओपी मूर्तींची संख्या झपाट्याने वाढली आहे.

झोननिहाय आकडेवारी-
मनपा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विविध झोनमध्ये पीओपी मूर्तींच्या संख्येत स्पष्ट वाढ दिसून आली आहे –

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लक्ष्मीनगर झोन (क्र. १): २६,१२३ मूर्तींपैकी ७५१ पीओपी
धरमपेठ झोन (क्र. २): १३,८९९ मूर्तींपैकी २,५७० पीओपी
हनुमाननगर झोन (क्र. ३): २१,५०१ मूर्तींपैकी १,३४९ पीओपी
धंतोली झोन: ११,८५२ मूर्तींपैकी ४७३ पीओपी
नेहरूनगर झोन: १५,७५४ मूर्तींपैकी ३२७ पीओपी
गांधीबाग झोन: २०,७२८ मूर्तींपैकी २६ पीओपी
सतरंजीपुरा झोन: १२,३८७ मूर्तींपैकी १,६७२ पीओपी
लकडगंज झोन: १३,७८३ मूर्तींपैकी ९२१ पीओपी
आशीनगर झोन: २,८२९ मूर्तींपैकी ५४४ पीओपी
मंगलवारी झोन: ६,३०६ मूर्तींपैकी ४५२ पीओपी

पर्यावरणपूरक मूर्तींबाबत जागरूकता कायम-
मनपा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मिट्टीच्या मूर्तींचं प्रमाण अजूनही ९४.१५% इतकं आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध जनजागृती मोहीमा राबवण्यात आल्या आहेत. मात्र, पीओपीवरील बंदी उठवल्याने यंदा या मूर्तींचा पुन्हा एकदा जोर वाढल्याचं स्पष्ट झालं आहे.

शहरात पर्यावरण-जागृती मोहिमा सुरू असल्या तरी पीओपी मूर्तींचा पुन्हा वाढता ट्रेंड प्रशासनासमोर नवी चिंता उभी करतो आहे.

Advertisement
Advertisement