
नागपूर : नागपूरच्या क्रीडा विकासाला मोठी चालना देणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या ₹100 कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या प्रकल्पामुळे नागपुरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रस्तावित क्रीडा संकुलात ३०० मुलांसाठी आणि ३०० मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, बहुउद्देशीय इनडोअर हॉल, २० मीटर आणि ५० मीटर शूटिंग रेंज, ४०० मीटर सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, हॉकीसाठी अॅस्ट्रोटर्फ मैदान, सिंथेटिक बास्केटबॉल कोर्ट, ७० मीटर आर्चरी रेंज, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल मैदाने, मिनी गोल्फ सुविधा, आधुनिक व्यायामशाळा, सौर ऊर्जा प्रकल्प, चेंजिंग रूम, पाणीपुरवठा व्यवस्था आणि इतर अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाला २० मे २०२६ रोजी उच्चस्तरीय सचिव समितीची मंजुरी, तर २५ जून २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती. आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने कामाला वेग येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक संपूर्ण निधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
प्रकल्पाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मुख्य कंत्राटदाराला अनुभवी क्रीडा पायाभूत सुविधा उभारणाऱ्या संस्थेसोबत जॉइंट व्हेंचर करूनच निविदा सादर करावी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प आंतरराष्ट्रीय निकषांनुसार उभारला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या क्रीडा विकासासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण आणि क्रीडा सुविधा उपलब्ध होतील तसेच नागपूरमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यास मोठी मदत होईल.
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...
मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime
मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर
वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...
नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...
रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra




