Published On : Wed, Jul 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर सायबर पोलिसांची कारवाई;E-20 इंधनाबाबत दिशाभूल करणाऱ्या पोस्टप्रकरणी चार युट्युबर्सविरुद्ध गुन्हा

Advertisement

नागपूर : केंद्र सरकारच्या E-20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाबाबत सोशल मीडियावर कथित दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बिहारमधील युट्युबर मनीष कश्यपसह आणखी तिघांचा समावेश असून, त्यांच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मनीष कश्यप, देसी बॉईज एनसीआर, हषित राठी आणि अंकलेश इनवाटे यांचा समावेश आहे. पोलिसांकडून त्यांच्या युट्यूब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट व व्हिडिओंची पडताळणी केली जात आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित इन्फ्लुएन्सर्सनी E-20 इथेनॉल धोरणासंदर्भात कथित गैरव्यवहार झाल्याचा दावा करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते. या व्हिडिओंमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव कोणताही ठोस पुरावा नसताना जोडण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी भाजपच्या नागपूर शहर सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष शिशिर त्रिपाठी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत, अधिकाधिक व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी खोटे दावे आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासात व्हिडिओंमधील अनेक दावे तथ्यांशी विसंगत असल्याचे समोर आल्याची माहिती आहे. तसेच संबंधित आरोपांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी कोणताही संबंध आढळून आलेला नसल्याचेही तपासात स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणामागे केवळ सोशल मीडिया प्रसिद्धीचा हेतू होता की अन्य कोणते कारण आहे, याचा सखोल तपास नागपूर सायबर पोलीस करत असून, तपासानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.