Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात प्रेयसीला महागड्या स्पोर्ट्स बाईकवर फिरवण्याचा शौक; तरुण बनला बाईकचोर

अजनी पोलिसांकडून आरोपीला अटक
Advertisement

नागपूर -नागपुरातील अजनी पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. प्रेयसीला महागड्या स्पोर्ट्स बाईकवर फिरवण्यासाठी आरोपीने दुचाकी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओम उर्फ रवि नरेंद्र येडे (वय २१, रा. गाडीखाना, गणेशपेठ) असे आहे. अयोध्यानगर येथील लाडीकर लेआउट परिसरातील अजय पाटील यांची केटीएम मोटारसायकल शताब्दी चौक परिसरातून चोरीला गेल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले. त्याआधारे आरोपीचा शोध सुरू असतानाच गस्तीदरम्यान तो चोरीच्या केटीएम बाईकसह फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने केवळ केटीएमच नव्हे, तर आणखी तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार सर्व चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

चौकशीत आरोपीने प्रेयसीला महागड्या स्पोर्ट्स बाईकवर फिरवण्याची इच्छा असल्याने आणि आर्थिक परिस्थितीमुळे नवीन बाईक घेणे शक्य नसल्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही वाहनचोरीचे पाच गुन्हे दाखल असून, इतर गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्याची चौकशी सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.