Published On : Thu, May 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुर हादरले ! शांतिनगरमध्ये 8 अल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य; आरोपी फरार

Advertisement

नागपूरच्या शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत एका सराईत गुंड्याकडून 8 अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन आणि छेडछाडीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, 27 वर्षीय निहाल कैथेल हा आपल्या वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलींना अश्लील इशारे करत होता. तसेच त्यांच्याशी छेडछाड करून त्यांचा पाठलाग करत असल्याचाही आरोप आहे. आरोपीच्या भीतीमुळे मुलींनी सुरुवातीला हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता.
दरम्यान, एका मुलगी घरगुती सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता आरोपीने तिचा पाठलाग करून रस्त्यात छेडछाड केल्याची घटना घडली. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलींमधील एका मुलीने धाडस करून आपल्या कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला.

यानंतर संबंधित मुलीच्या वडिलांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांच्याशी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संतप्त कुटुंबीयांनी शांतिनगर पोलीस ठाण्यात
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी निहाल कैथेल याच्यावर यापूर्वी चोरी आणि अवैध शस्त्र बाळगल्याचे गुन्हेही दाखल आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्या आरोपी फरार असून शांतिनगर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Advertisement
Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges