Published On : Tue, Jun 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर हादरलं; नव्या पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच फुटाळ्यात खून, कुख्यात शेखूच्या पुतण्याची हत्या!

Advertisement

नागपूर -नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी शहरातील फुटाळा परिसरात घडलेल्या एका निर्घृण हत्येने कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी अमन शेख या तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. अमन हा कुख्यात गुन्हेगार शेखूचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली असून, या हत्येमागे जुन्या वैमनस्याचा किंवा टोळीयुद्धाचा संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-
प्राथमिक माहितीनुसार, फुटाळा परिसरातील एका दुकानाजवळ अमन शेख आणि योगेंद्र उर्फ लाला पांडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन अमनने लाला पांडेला थप्पड मारल्याचे सांगितले जाते. त्यानंतर लाला तेथून निघून गेला.

काही वेळाने तो आपल्या भाऊ जंगली पांडे आणि इतर साथीदारांसह परत आला. हल्लेखोरांनी अमनला चारही बाजूंनी घेरत चाकू आणि तलवारीने वार केले. गंभीर जखमी झालेला अमन घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

भरवस्तीत खून, सुरक्षेवर प्रश्न-
फुटाळा हा शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर मानला जातो. अशा ठिकाणी भरदिवसा झालेल्या या हत्येनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या वेळी परिसरात पोलीस गस्त नसल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला असून, सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

तिघे ताब्यात; फरार आरोपींचा शोध-
गिट्टीखदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला आहे. आतापर्यंत तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

टोळीयुद्धाचा कोन तपासात-
मृत अमन शेखचा संबंध कुख्यात शेखू टोळीशी असल्याने या हत्येनंतर शहरात दोन गटांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

नव्या पोलीस आयुक्तांसमोर पदभार स्वीकारल्यानंतरच उभे राहिलेले हे पहिले मोठे आव्हान मानले जात आहे. या हत्येचा उलगडा आणि संभाव्य टोळीयुद्ध रोखण्यात पोलीस किती प्रभावी ठरतात, याकडे संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.