Published On : Sat, Jul 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; विदेशी महिलांना आमिष, 5 पीडितांची सुटका, एकाला अटक

Advertisement

नागपूर : नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने धडक कारवाई करत विदेशी आणि परराज्यातील महिलांकडून देहव्यापार करून घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी ‘Login Personal Meeting’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधून महिलांना देहव्यापारासाठी उपलब्ध करून देत होते. या माहितीच्या आधारे बोगस पंटर व पंचांच्या उपस्थितीत गोकुळपेठ येथील हॉटेल पेटल इनसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान उझबेकिस्तानमधील दोन महिलांसह पंजाब, दिल्ली आणि कोलकाता येथील तीन अशा एकूण पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143(2)(3) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा, 1956 मधील कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

या प्रकरणात सचिन माणिकराव महाजन (वय 38, रा. भवानीनगर, पुणा रोड, नागपूर) याला अटक करण्यात आली आहे. समीर उर्फ मनीष उर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा नावाची महिला हे तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

कारवाईदरम्यान पोलिसांनी 5 लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार, 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि 8 हजार रुपये रोख असा एकूण 5 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास अंबाझरी पोलीस करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.