Published On : Wed, Aug 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात स्कॉर्पिओत अपहरण… दूर नेऊन थर्ड डिग्री; स्क्रॅप चोरी कबूल करण्यासाठी दोन तरुणांचा अमानुष छळ!

Advertisement

नागपूर :नागपूरमध्ये कायदा हातात घेत दोन तरुणांचे भररस्त्यात अपहरण करून त्यांना स्कॉर्पिओतून ७ किलोमीटर दूर नेण्यात आले… तेथे स्क्रॅप चोरीची कबुली देण्यासाठी अमानुष मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देत आरोपी पसार झाले. या धक्कादायक प्रकरणात पारडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तीन आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.

नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. फिर्यादी सनी सिंग आणि त्याचा मित्र गोलू राजवीर हे ट्रान्सपोर्ट कंपनीजवळ उभे असताना स्कॉर्पिओमधून आलेल्या चार जणांनी त्यांना गाठले. स्क्रॅप चोरीच्या संशयावरून दोघांची चौकशी सुरू झाली. परिस्थिती बिघडताच गोलू पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्यालाही पकडले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर दोघांनाही जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवून सुमारे ७ किलोमीटर दूर निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तेथे दोघांना लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. स्क्रॅप चोरीची कबुली देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. कबुली न दिल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. मारहाणीनंतर दोघांना तेथेच सोडून आरोपी पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत रमजान शाह, फैजान आणि यादव या तिघांना अटक केली. तर चौथा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अपहरण, मारहाण, जीवे मारण्याची धमकी यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारडी पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.