Published On : Fri, Sep 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मिरची पावडर फेकून एसबीआय बँकेत लूट; ४ लाखांहून अधिक रोकड घेऊन आरोपी फरार

Advertisement

नागपुरात मिरची पावडर फेकून एसबीआय बँकेत लूट; ४ लाखांहून अधिक रोकड घेऊन आरोपी फरार

नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट चौक येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सायंकाळी दिवसाढवळ्या लुटीची घटना घडल्याने खळबळ उडाली. एका आरोपीने बँक कर्मचाऱ्यांवर मिरची पावडर फेकून चार लाख रुपयांहून अधिक रोकड लुटून पलायन केले.

लुटीची संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख २८ वर्षीय सूरज बोरकर अशी झाली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. या लुटीच्या कटात आणखी कोणी सहभागी होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.