Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर–सावनेर महामार्गावर भीषण अपघात; तिन्ही कारांची धडक, २८ वर्षीय चालकाचा मृत्यू

Advertisement

नागपूर : नागपूर–सावनेर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण साखळी अपघात झाला. दहेगाव रंगारी येथील काश्मिरा लॉन्ससमोर तीन चारचाकी वाहनांची धडक होऊन २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर धडक देणारे अज्ञात काळ्या रंगाचे वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून खापरखेडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२७ बीई-६१६३ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार सावनेरहून नागपूरच्या दिशेने जात होती. काश्मिरा लॉन्ससमोर चालक यू-टर्न घेत असताना नागपूरहून सावनेरकडे जाणारी हुंडई आय-२० कार आणि तिच्यामागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या अज्ञात वाहनामध्ये धडक झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिल्याने ती समोरून येणाऱ्या आय-२० कारवर आदळली.

Gold Rate
July 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,800 /-
Gold 22 KT ₹ 1,32,500 /-
Silver/Kg ₹ 2,19,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धडक इतकी भीषण होती की आय-२० चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला तब्बल तीन वेळा पलटी झाली. या अपघातात आय-२० कारचा चालक यशवंत चंदेल (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला. ते पारशिवनी तालुक्यातील निंबा गावाकडे जात असल्याची माहिती आहे.

या भीषण अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून आणखी एक महिला आणि दोन लहान मुलेही जखमी झाली आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन महिन्यांच्या चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

अपघातानंतर धडक देणारे काळ्या रंगाचे वाहन चालकासह घटनास्थळावरून पसार झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी ते वाहन ‘थार’ असल्याची शक्यता व्यक्त केली असली तरी पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले तसेच वाहतूक सुरळीत करण्यात आली. फरार वाहनाचा शोध घेण्याबरोबरच अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
नागपुर-सावनेर हाईवे पर भीषण सड़क हादसा.. #nagpurnews #accident #highway #newsupdate #todaynews

नागपुर-सावनेर हाईवे पर भीषण सड़क हादसा.. #nagpurnews #accident #highway #newsupdate #todaynews

सावनेर में बड़ा सड़क हादसा.. स्टील से भरा ट्रक पलटा #RoadAccident #TruckAccident #nagpurnews #saoner

सावनेर में बड़ा सड़क हादसा.. स्टील से भरा ट्रक पलटा #RoadAccident #TruckAccident...

निर्मल उज्ज्वल: जमाकर्ताओं का पैसा आखिर कब मिलेगा?क्लीन चिट के दावों के बीच बड़ा सवाल!

निर्मल उज्ज्वल: जमाकर्ताओं का पैसा आखिर कब मिलेगा?क्लीन चिट के दावों के...

नागपुर में रंगदारी का आतंक! बेसबॉल बैट से हमला #NagpurNews #CrimeNews #Extortion #police #viral

नागपुर में रंगदारी का आतंक! बेसबॉल बैट से हमला #NagpurNews #CrimeNews #Extortion...

गाय के साथ अश्लील हरकत करने वाला सिरफिरा गिरफ्तार #NagpurNews #CrimeNews #Mankapur #AnimalCruelty

गाय के साथ अश्लील हरकत करने वाला सिरफिरा गिरफ्तार #NagpurNews #CrimeNews #Mankapur...

राम मंदिर दान राशि मुद्दे पर वर्धा में कांग्रेस का सत्याग्रह #rammandir #Congress #news #political

राम मंदिर दान राशि मुद्दे पर वर्धा में कांग्रेस का सत्याग्रह #rammandir...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges