नागपूर – शिस्त, नवचैतन्य आणि जनतेशी दृढ नातं! या मूल्यांना अनुसरून नागपूर ग्रामीण पोलिस दलाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या ‘100 दिवसीय कार्य योजना’ या विशेष उपक्रमात नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
भारतीय गुणवत्ता परिषदेने केलेल्या मूल्यमापनात नागपूर ग्रामीण पोलिसांना १०० पैकी ८० गुण मिळाले असून, हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम स्कोअर आहे.
या यशावर नागपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबल यांनी संपूर्ण ग्रामीण पोलिस दलाचे अभिनंदन करत त्यांना प्रेरणादायी म्हटले.
अभियानाचा कालावधी आणि उद्दिष्टे-
हा उपक्रम ७ जानेवारी ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत राबवण्यात आला. या काळात पोलिस विभागाने तांत्रिक सुधारणा, प्रशासनिक पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
मुख्य कार्यक्षेत्रे – परिवर्तनाचा पाया-
-आधुनिक आणि सुलभ वेबसाईटचा विकास
– केंद्र शासनाशी समन्वय
-कार्यालयीन स्वच्छता आणि कार्यसंस्कृती सुधारणा
-तक्रारींवर जलद निवारण
-पोलिस कर्मचाऱ्यांचे आधुनिक प्रशिक्षण
-तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यपद्धतीत पारदर्शकता
इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरणारे काम-
या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ पाच पोलिस अधीक्षक कार्यालयांची निवड करण्यात आली. यामध्ये पालघरने प्रथम तर नागपूर ग्रामीणने द्वितीय स्थान पटकावले आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी जनतेशी विश्वासाचे नाते जोडणारी, उत्तरदायित्व असलेली आणि आधुनिकतेकडे झुकणारी पोलीस सेवा निर्माण केली आहे.image.png