Published On : Mon, Aug 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात संघप्रमुखांच्या ताफ्याजवळ चाकू हल्ल्याने खळबळ; पोलिसांनी केला ‘हा’ खुलासा!

Advertisement

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ताफ्याच्या मार्गावर चाकू हल्ल्याची घटना घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेचा डॉ. मोहन भागवत यांच्या ताफ्याशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. मोहन भागवत यांचा ताफा संघ मुख्यालयातून विमानतळाच्या दिशेने जात असताना आयचित मंदिर परिसरातून पुढे गेला. त्याचवेळी मंदिराजवळील एका गल्लीत आकाश ढोमणे याच्यावर गणेश वानखेडे याने चाकूने हल्ला केला. हल्ल्यात आकाश ढोमणे जखमी झाला आहे.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्राथमिक तपासानुसार, एका महिलेच्या संदर्भातील वादातून दोघांमध्ये भांडण झाले होते. वाद वाढल्यानंतर गणेश वानखेडे याने आकाश ढोमणेवर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर जखमी आकाश ढोमणे आणि आरोपी गणेश वानखेडे हे धावत मुख्य रस्त्याच्या दिशेने आले. याचवेळी डॉ. मोहन भागवत यांचा ताफा त्या मार्गावरून पुढे गेल्याने काही काळ परिसरात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

मात्र, या चाकू हल्ल्याचा डॉ. मोहन भागवत यांच्या ताफ्याशी किंवा त्यांच्या हालचालींशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही घटना वैयक्तिक वादातून घडल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वादाचे नेमके कारण आणि घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.