Published On : Fri, Sep 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण; ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Advertisement

नागपुरात ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण; ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

नागपूर : ढोल-ताशांचा कडकडाट, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.

घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना आज भावपूर्ण निरोप दिला जात आहे. नागपूर जिल्ह्यात विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका वाजतगाजत निघाल्या असून, ढोल-ताशांच्या गजराने आणि बाप्पाच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांकडून गुलालाची उधळण केली जात असून, ढोल-ताशांच्या तालावर जल्लोष पाहायला मिळत आहे. उत्साहासोबतच लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविक भावूक झाल्याचेही चित्र आहे.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात येत असून, विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.