Published On : Fri, Sep 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अखिल भारतीय पोलिस टेबल टेनिस स्पर्धेसाठी हर्षदीप खोब्रागडे यांची महाराष्ट्र पोलिस संघात निवड

Advertisement

अखिल भारतीय पोलिस टेबल टेनिस स्पर्धेसाठी हर्षदीप खोब्रागडे यांची महाराष्ट्र पोलिस संघात निवड

नागपूर : नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल हर्षदीप खोब्रागडे यांची गुजरातमधील अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय पोलिस टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलिस संघात निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नागपूर शहर पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पोलिस विभागातील कर्तव्य बजावत असतानाच हर्षदीप खोब्रागडे हे उत्कृष्ट टेबल टेनिसपटू म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. सन 2022 पासून ते अखिल भारतीय पोलिस टेबल टेनिस स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील टेबल टेनिस खेळाडूंचा शोध घेऊन त्यांचा संघ तयार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हर्षदीप यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचा टेबल टेनिस संघ तयार झाला. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत या संघाने एक सुवर्णपदक आणि चार कांस्यपदके पटकावून अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र पोलिस दलाची प्रभावी उपस्थिती नोंदवली. यामध्ये हर्षदीप खोब्रागडे यांनी स्वतःही कांस्यपदक पटकावून महाराष्ट्र पोलिस दलाचा गौरव वाढवला आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी त्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविले होते. तसेच नागपूरचे तत्कालीन पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनीही हर्षदीप यांचे अभिनंदन करून त्यांच्या क्रीडा कामगिरीचे कौतुक केले होते.

Advertisement

पुण्यातील निवड चाचणीत चमकदार कामगिरी
आगामी 19 ते 24 नोव्हेंबर 2026 दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील वीर सावरकर क्रीडा संकुलात तिसरी अखिल भारतीय पोलिस टेबल टेनिस स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलिस दलातील टेबल टेनिसपटूंची निवड चाचणी 21 व 22 ऑगस्ट रोजी पुणे येथे घेण्यात आली.

या निवड चाचणीत पोलिस हेड कॉन्स्टेबल हर्षदीप खोब्रागडे यांनी दमदार आणि प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची महाराष्ट्र पोलिस टेबल टेनिस संघात निवड करण्यात आली.

हर्षदीप यांच्या निवडीबद्दल नागपूर शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धेत उत्तम कामगिरी करून महाराष्ट्र पोलिस दलाचा लौकिक वाढवावा, अशा शुभेच्छाही त्यांनी हर्षदीप यांना दिल्या.

कर्तव्य बजावताना क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हर्षदीप खोब्रागडे यांच्या या निवडीचे नागपूर शहर पोलिस दलात सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.