Published On : Sat, Oct 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकरांना आज पाहता येणार वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण !

Advertisement

नागपूर : आज २८ ऑक्टोबर २०२३ ला मध्यरात्री वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे.भारतातून रात्री १.०५ वाजेपासून २.२२ पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण भारता सहित आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, येथेही दिसेल, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी दिली.

छायाकल्प चंद्रग्रहणाची सुरुवात ११.३१ वाजता सुरुवात होईल. तर १.०५ मिनिटाने खंडग्रास ग्रहण लागण्यास सुरुवात होईल. १.४४ ला सर्वाधिक ग्रहण होईल. यावेळी चंद्र १० ते १२ टक्के ग्रस्तोदित असेल.

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,100 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,45,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२.२२ मिनिटाने खंडग्रास ग्रहण संपेल परंतु साध्या डोळ्याने न दिसणारे छायाकल्प चंद्रग्रहण ३.५६ वाजता संपेल. संपूर्ण ग्रहनाचा काळ ४.२५ तासाचे तर खंडग्रास ग्रहण १.१८ तासाचे असेल. यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी झाले होते. आजचे चंद्रग्रहण हे वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे.

दरम्यान सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहणे होतात. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्यामुळे चंद्र ग्रहण होते. चंद्र ग्रहणाचे छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास असे तीन प्रकार आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement