Published On : Tue, May 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकरांनो सावधान! शहरात पुन्हा वाढणार उष्णतेचा तडाखा; हवामान विभागाचा इशारा

Advertisement

नागपूर : अवकाळी पावसानंतर काही दिवस दिलासा मिळालेल्या नागपूरकरांसमोर आता पुन्हा उष्णतेचं संकट उभं राहिलं आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि गुजरात परिसरातील चक्रावाती स्थितीमुळे विदर्भात कोरडी आणि उष्ण हवा वाहत आहे. त्याचा थेट परिणाम नागपूरच्या तापमानावर होत असून शहरातील उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी नागपूरमध्येही उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत. सकाळपासूनच कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून दुपारच्या वेळेत नागरिक घरातच राहणं पसंत करत आहेत.

उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे आणि दुपारी ११ ते ३ दरम्यान उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस नागपूरमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges