Published On : Mon, May 11th, 2020

नागपूरच्या रहिवाशाचा दुबईत कोरोनाने मृत्यू

सेल्फीवरच झाले शेवटचे दर्शन

नागपूर : शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा दुबईमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे त्यांची पत्नी, मुलगी व नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही.

Advertisement

या व्यक्तीचा दुबईच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. व्हेंटिलेटरवर असताना त्याने मोबाईलने सेल्फी घेतली आणि दुसºयाच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. मृत कोरोनाचा रुग्ण असल्याने त्यांचे पार्थिव दुबई प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले.

नागपुरात राहणाºया त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती फोनवरच मिळाल्यानंतर त्यांची पत्नी, लहान मुलगी व अन्य कुटुंबीय दु:खात बुडाले आहे. दोन्ही देशात लॉकडाऊन असल्याने पत्नी आपल्या पतीचे व मुलगी आपल्या पित्याचे अंतिम दर्शन सुद्धा घेऊ शकली नाही.

दरम्यान मृताचा मोबाईल फोन हॉस्पिटल प्रशासनाने दुबई येथे निवासास असलेल्या त्याच्या भावाकडे सोपविला आहे. त्या मोबाईलमध्ये मृताने व्हेंटिलेटरवर घेतलेली सेल्फी होती. त्यांनी ही सेल्फी नागपुरातील मृताच्या मुलीच्या मोबाईलवर पाठविली. याच सेल्फीच्या आधारे पत्नीने आपल्या पतीचे अंतिम दर्शन घेतले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement