Published On : Thu, Jul 23rd, 2015

नागपूर : वन्य प्राण्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता, शासनाचा नवीन कायदा अमलात


आमदार डॉ आशिष देशमुखांच्या प्रयत्नांना यश 

ASHISH-DESHMUKH
कटोल (नागपूर)।
राज्य वनजीव मंडळयाचा 22 जुलै चा 9 व्या बैठकीत रोही व रानडुक्कर या जंगली व हिंसक प्राणांच्या त्रासा पासून शेतकऱ्यांची सुटका करण्या बाबत सविस्तर चर्चा झाली व काटोलचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी वेळो वेळी राज्याचे वन मंत्री मा. सुधीर मुणगंटीवार यांना सुचना केल्या तसेच विधानसबेत सुद्धा मुद्दा लाऊन धरला काटोल निर्वाचन क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी जंगल लगतच्या भागाला मोठया प्रमाणात लागून असुन तेथील शेतकरी शेतीवरच अवलंबून आहे परंतु गेल्या कितेक वर्षा पासून शेतकऱ्यांना रोही व रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन या वन्य प्राण्यांच्या तावडीतून सुटका करून पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे काटोलचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी शेतकऱ्यांचे हित आणि गरज लक्ष्यात घेता वन्य प्राण्यापासून कायम सूटका करण्याकरिता शासन तळावर मी प्रयत्न करील असे आश्वासन दिले होते. बुधवार 22 जुलै ला शासनाने जि. आर. काढून वन्य प्राण्यांना ठार मारण्याची परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन आमदार डॉ आशिष देशमुख यांनी आश्वासनाची पूर्तता केली.

नवीन कायद्यानुसार वन्य प्राण्यांना ठार मारण्या करिता शेतकऱ्यांनी संबंधित वन क्षेत्रपाल यांच्या कडे अर्ज देऊन पोच पावती प्राप्त करावी, रोही व रानडुक्कर यांना मारण्या करिता त्या बाबतचा परवाना 24 तासाच्या आत निर्गमित करावा जर 24 तासाच्या आत परवाना दिला नाही किवा नाकारला तर अर्जदाराला परवाना देण्यात आलेला आहे असे गृहीत धरून रोही व रानडुक्कर यांना ठार मारता येईल, राष्ट्रीय उद्याने अभयारण्य व्याघ्र प्रकल्प, संवर्धन, या राखीव क्षेत्रात कुठल्याही परीस्थितीत वन्य प्राण्यांना ठार मारता येणार नाही अभयारण्य राष्ट्रीय उद्यानाच्या सीमे पासून 5 कि.मी. सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदीने वापर करतांना अत्याधिक काळजी घेण्यात यावी व वन्य प्राण्यांना ठार करण्याच्या परवानगीत ठार करण्यासाठी लागणारा व्यहवारिक कालावधी व क्षेत्र या बाबतचा तपशील नमूद करावा तसेच परवानाधारकाने त्याचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येक महिण्यात देण्यात आलेले परवाने व त्या अनुसार ठार करण्यात आलेल्या रानडुक्कर व रोही यांच्या संखेबाबत व विलेवाटीचा तपशिलाचा मासिक अहवाल वनक्षेत्रापाल यांनी संबंधित उपवनसंरक्षक यांच्या कडे सादर करावा उपवनसंरक्षक व त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर ठार झालेल्या वन प्रण्याबाबत दर महिण्यात आढावा घेऊन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) यांचे कडे अहवाल पाठवावा.

सदर शासन परिपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे असुन हा आदेश मा. अरविंद आपटे विशेष कार्याअधिकारी (महसूल व वन विभाग) यांच्या नावाने व महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला आहे या वन्य प्राण्यांच्या तावडीतून सुटका केल्या बद्दल काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार डॉ आशिष देशमुख यांचे अभिनंदन केले व धन्यवाद दिले.