Published On : Thu, Jul 23rd, 2015

बुलढाणा : नववीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिला शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या

शिक्षक आघाडीच्या आक्रमतेने प्रशासन हादरले 

Students
बुलढाणा।
इयत्ता नववी मध्ये प्रवेश देवून दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम ठेवण्यात यावे, या मुख्य मागण्यासाठी निमगाव गुरू येथील स्व. भास्कररावजी शिंगणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी गुरुवार 23 जुलै रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची गंभीर दखल घेवुन शिक्षक आघाडीचे गजानन उंबरहंडे, तालुका अध्यक्ष सतिश बिलारी आणि त्यांच्या पदाधिकाºयांनी आक्रम पवित्रा घेत शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने प्रशासन काही काळ हादरले. तद् नंतर सामोपचारिक चर्चेतुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होणार नाही, अशी खात्री मिळाल्याने हे गंभीर आंदोलन तुर्तास थांबविण्यात आले.

गेल्या काही वर्षापासून देऊळगावराजा तालुक्यातील निमगाव गुरू येथे स्व. भास्कररावजी शिंगणे विद्यालय सुरू करण्यात आले आहे. या विद्यालयात गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. परंतु शाळा प्रशासनाने अद्यापही गावातील विद्यार्थ्याना इयत्ता नववी मध्ये प्रवेश देण्यात आला नाही. शाळेच्या पहिल्या दिवसापासून गावातील विद्यार्थी वर्गात बसत आहेत. परंतु आजपर्यत मुख्याध्यापीकेच्या मनमानी कारभारामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास मनाई केली असून विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचे सांगीतले. एवढेच नव्हेतर काल 22 जुलै रोजी मुख्याध्यापीकेने दहाव्या वर्गात जावून तुमचे या शाळेत नुकसान होईल, त्यासाठी तुम्ही इतर शाळेत प्रवेश घ्यावा, अशी नोटीस वाचवून दाखविली. ऐनवेळी मुख्याध्यापीकेने इयत्ता नववी व दहावीमध्ये प्रेवश नाकारल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून गावातील मुलांना त्याच शाळेत प्रवेश देवून इयत्ता दहावीचा प्रवेश कायम ठेवण्यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी 23 जुलै रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच या आंदोलनाला पाठींबा म्हणुन शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन उबरहंडे व तालुका अध्यक्ष सतिश बिलारी यांनी विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहिल्यास शिक्षक आघाडी विद्यार्थ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिल, असे आश्वासन दिले. व या गंभीर प्रकरणाची माहिती पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आघाडीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना दुरध्वनीवरुन या विषयची माहिती दिली. त्यांनी देखील या निंदनीय घटनेचा निषेध केला असुन अशा संस्थाचालकाविरुध्द कठोर कारवाईची भुमिका घेतली जाईल, असे सांगीतले.

या अघोषीत आंदोलनामध्ये स्व.भास्करराव शिंगणे विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी रेखा शेषराव धारे, अश्विनी श्रीकृष्ण धारे, रेणुका धारे, गोदावरी धारे, ज्योती नेरकर, शिवकन्या काकडे, अश्विनी राऊत, मनिषा चित्ते, दशरथ चित्ते, प्प्रविण भालेराव, लिंबाजी निकाळजे, राम निकाळजे, अंकुश डोंगरदिवे, कैलास डोंगरदिवे, शिल्पा भालेराव, प्रिया भालेराव, गणेश चित्ते, बद्रिनाथ धारे, राजेश भिसे, सुनिल पाटोळे, पुष्पा धारे, लक्ष्मी धारे, देवयानी दहेकर, रेणुका धारे, अश्विनी राऊत, अनिता राऊत या सह असंख्य विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला होता. शिक्षक आघाडीचे पदाधिकारी व विद्यार्थी यांच्या आक्रम भुमिकेमुळे जि.प.व पोलिस प्रशासनाचे धाबे दणानले होते.