Published On : Mon, Jul 13th, 2015

नागपुर : पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याकरिता मुख्यमंत्र्याना निवेदन

Saavner
सावनेर (नागपूर)। मराठी पत्रकार संघ तालुका सावनेरचा मार्फ़त पत्रकार संरक्षण कायदा करण्याबाबताचे व जेष्ठ पत्रकारांना पेंशन योजना लागू करण्याबाबताचे निवेदन नम्रता चाटे यांचा मार्फ़त मुख्यमंत्री देवेंद्र फाड़नवीस यांना देण्यात आले.

गेल्या कित्तेक वर्षापासून पत्रकारांना संरक्षण कायदा व्हावा व जेष्ठ पत्रकारांना पेंशन मिळावी अशी मागणी मराठी पत्रकार मुंबई व नागपुर जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच पत्रकार हल्ला कृती समिती संघ करीत आहे. सध्या पत्रकारांच्या हल्यामध्ये चिंताजनक वातावरण होत असल्याने राज्य सरकारने तातडीने पत्रकार रक्षण कायदा करावा तसेच जेष्ठ पत्रकारांना पेंशन देण्यात यावी.

महाराष्ट्रासह देशभरात पत्राकारावर होत असलेल्या हल्लेचा घटनेत वाढ होत असून राज्यात गेल्या तिन वर्षात 181 पत्रकारांवर हल्ले झाले असून 2015 या वर्षातील 6 महिन्यातच हल्ल्याची संख्या 42 आहे. राज्यात सरासरी दर 5 दिवसात 1 पत्रकारावर हल्ला होत असल्याचे चित्र असल्याने पत्रकारांवरील हल्ला हा अजमिन पात्र गुन्हा घोषित करावा आणि पत्रकारावरील हल्याचे खटले जलतगती न्यायालयात चलउन पत्रकार हल्यामध्ये गंभिर जखमी होतील अशा पत्रकारांना 5 लाख रुपयाचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली असून नुकतेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथे पत्रकारांवर प्राणघातक हल्ले झाले असून अश्या घटनांची या वेळी तीव्र शब्दात निषेद करुण आता राज्य सरकारने पत्रकारांचा जास्त अंत न बघता तातडीने पत्रकारांना संरक्षण कायदा करुण देशातील पाहिले राज्य असा लौकिक संपादन करावा. तसेच जेष्ठ पत्रकारांना पेंशन सुरु करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अरुण रुषिया यांचा नेतृत्वात किशोर ढुंडेले, सुधाकर बागडे, दीपक कटारे, रितेश पाटील, प्रा.योगश पाटील,संजय टेंभेकर, सुरेश मारोतकर, हिराजी रामटेके सह तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.