Published On : Thu, Apr 11th, 2019

नागपुरात उमेदवार यादीवर नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का

नागपूर : नागपुरातील न्यू इंग्लिश स्कूलमधल्या मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले होते. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारण्यात आला होता.

मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते. मात्र या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे ‘रिजेक्टेड’ असे शिक्के मारण्यात आले होते. हे शिक्के कुणी मारले हे अद्याप अस्पष्ट आहे. नितीन गडकरींनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही पुन्हा एकदा गडकरींनी व्यक्त केला. मतदानापूर्वी गडकरींनी घरी स्वतः पत्नी कांचन यांच्यासह गणपतीची पूजा केली.

Advertisement

नितीन गडकरींच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनीही नागपुरात सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. सुरक्षेच्या लवाजम्यात सरसंघचालक मोहन भागवत सकाळी सात वाजण्यापूर्वीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले होते.

Advertisement

दरम्यान, नागपुरात ज्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदानाचा हक्क बजावतात, त्या ठिकाणीच व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे तब्बल तासभर मतदार खोळंबले होते. धरमपेठ स्कूल इथल्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री मतदान करतात. न्यू इंग्लिश स्कूल इथल्या मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले होते. मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी मतदान केंद्रबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते. मात्र या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आले होते. हे शिक्के कुणी मारले हे अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement