Published On : Sat, Aug 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या रामझुल्यावर चोरी;४८ तासांत चार आरोपी जेरबंद

Advertisement

नागपूरच्या रामझुल्यावर चोरी;४८ तासांत चार आरोपी जेरबंद

नागपूर : गणेशपेठ परिसरातील रामझुला पुलावर प्रवाशाला अडवून त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या घटनेचा गुन्हे शाखेच्या चैन स्नॅचिंग विरोधी पथकाने अवघ्या ४८ तासांत छडा लावला. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी तक्रारदार मध्य प्रदेशात जाण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होता. रामझुला पुलावर पोहोचला असता आरोपींनी त्याला अडवून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावली आणि घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या चैन स्नॅचिंग विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत ४८ तासांच्या आत चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विनोद ऊर्फ मायकल गर्जेश मालाकार, कन्हैया मालाकार आणि राहुल ऊर्फ पगला मालाकार यांच्यासह एका आरोपीचा समावेश आहे. मुख्य आरोपी विनोद ऊर्फ मायकल याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात यापूर्वीही विविध कलमांनुसार गुन्हे दाखल असून, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.