Published On : Tue, Jul 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पावसाचा हाहाकार; ३७ ठिकाणी आपत्कालीन मदतकार्य, ४६१ नागरिकांची सुखरूप सुटका!

Advertisement

नागपूर : मुसळधार पावसाने मंगळवारी नागपूर शहराला अक्षरशः झोडपून काढले. अनेक भाग जलमय झाल्याने नागरिक अडकून पडले. या गंभीर परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने ३७ आपत्कालीन घटनांवर धाव घेत ४६१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा २४ तास सतर्क ठेवली आहे.

महापालिकेला प्राप्त झालेल्या ३७ तक्रारींपैकी २१ पाणी साचल्याच्या, ४ झाडे कोसळल्याच्या आणि १२ बचावकार्यासंदर्भातील होत्या. प्रत्येक ठिकाणी तातडीने पथके रवाना करून मदतकार्य करण्यात आले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमलवार शाळेत थरारक बचावमोहीम-
खामला येथील सोमलवार शाळेच्या परिसरात पाणी शिरल्याने विद्यार्थी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढत मोठी दुर्घटना टाळली. स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी-वाखरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेतला आणि पालकांना दिलासा दिला.

नरेंद्रनगरमधील एका शाळेतही पाणी साचल्याची माहिती मिळताच अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अंबाझरी बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये अडकलेल्या नागरिकांची एसडीआरएफच्या मदतीने सुरक्षित सुटका करण्यात आली.

Advertisement

महापौर आणि आयुक्त मैदानात-
महापौर नीता ठाकरे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी नरसाळा, हुडकेश्वरसह विविध पूरग्रस्त भागांची पाहणी करून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले. सखल भागातील नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन २९ जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.