Published On : Tue, Dec 10th, 2019

नागपुरातील महिला धावत्या रेल्वेतून बेपत्ता?

Advertisement

– पुण्याला पोहोचलीच नाही,संपर्कही तुटला,महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमुळे प्रकरण गंभीर

नागपूर :नागपुरातून रेल्वेने पुण्याकरीता निघालेली महिला नियोजितस्थळी पोहोचलीच नाही. भ्रमणध्वनी संपर्कही तुटला. अचानक बेपत्ता झाल्यामुळे भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला.

या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून केली आहे. हा प्रकार गोंदिया – महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये घडला. महिलांवर अत्याचाराच्या घटना लक्षात घेता हे प्रकरणही पोलिसांनी गंभीरतेने घेतले आहे.

मानेवाडा परिसरातील ४५ वर्षीय महिलेला पुण्याला जायचे होते. पुण्यात शिवाजीनगर परिसरात मुलांना सांभाळण्याचे काम होते. त्यासाठी रविवारी सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास ती अजनी रेल्वे स्थानकाहून पुण्यासाठी निघाली. सोमवारी सकाळी त्यांना शिवाजीनगरात म्हणजे नियोजित ठिकाणी पोहोचायला पाहिजे होते. मात्र, त्या पोहोचल्याच नाही.

प्रवासादरम्यान पतीने तिच्यासोबत फोनवर चर्चाही केली. मनमाड पर्यंत ती संपर्कात होती. त्यानंतर मात्र, तिचा संपर्कही तुटला. त्यामुळे भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी संबधीत ठिकाणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळली नाही. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांना आपली कैफियत मांडली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेवून शोधाशोध सुरू केली आहे. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणाची नोंद झाली नव्हती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गोंडाणे यांनी कुटुंबीयांना दिलासा देत ठिकठिकाणी शोधमोहीम राबविली. पोलिसांनी शुन्यची नोंद करून हे प्रकरण मनमाडला वर्ग केले आहे.

पुण्याहून आला फोन
मुलगी सांभाळायची आहे, अशा आशयाची जाहिरात काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात प्रकाशीत झाली. जाहिरातीचा मथळा वाचून नागपुरातील महिलेने पुण्याला संपर्क साधला तसेच रविवारी पुण्यासाठी निघाली. सोमवारी सकाळी ती पुणा रेल्वे स्थानकावर पोहोचणार असल्याने जाहिरात देणारी महिला तिला घेण्यासाठी पुणा रेल्वे स्थानकावर पोहोचली. मात्र, नागपुरातील महिला पुण्याला पोहोचलीच नाही. अखेर जाहिरात देणाèया महिलेनी नागपुरात तिच्या पतीकडे संपर्क साधला, त्या पुण्याला पोहोचल्याच नसल्याचे सांगितले. कदाचित त्यांचा मोबाईल बंद झाला असावा तसेच त्या नियोजित स्थळाचा पत्ता विसरल्या असाव्यात अशी शक्यता वर्तविली जात असली तरी, कुटुंबीयांची qचता वाढली आहे.

पोलिसांमुळे तुरुणी सुखरुप
नागपूर विभागातील कळंब रेल्वे स्थानकावर एक २५ वयोगटातील तरूणी एकटीच फिरत होती. पोलिसांचे तिच्याकडे लक्ष होते. बèयाच वेळपासून ती एकटीच असल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी तिची आस्थेनी विचारपूस केली. त्यानंतर तिला नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले. पोलिसांनी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला शासकीय वसतिगृहात पाठविण्यात आले. अलिकडे हैदराबाद आणि उन्नाव येथील घटनेमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. रविवारी कळमेश्वरात एका चिमुकलीची हत्या करण्यात आली. एकंदरीत मुली आणि महिलां भयभीत झाल्या असून देशभरात या घटनांचा निषेध सुरू आहे. यापाश्र्वभूमिवर लोहमार्ग पोलिसांनी माणुसकीचा परिचय देत तरुणीला मदतीचा हात दिला