Published On : Wed, Jan 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर रेल्वे स्थानकावर चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपींना अटक,लाखोंचा माल जप्त

Advertisement

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणात रेल्वे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून चोरीचे पाच मोबाईल फोन, एक मनी पर्स आणि रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याच आरोपींकडून चौकशीदरम्यान चोरीचे सहा गुन्हेही उघडकीस आले आहेत.

सध्या सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे रेल्वे स्थानकावर लोकांची गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत गर्दीत सक्रिय असलेले चोर चोरी करत आहेत. या कारणास्तव, नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून विशेष गस्त आणि पाळत ठेवण्यात येत होती.

Gold Rate
28 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,64,400/-
Gold 22 KT ₹ 1,52,900 /-
Silver/Kg ₹ 3,72,000 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, स्टेशनवर आलेल्या एका ट्रेनच्या जनरल कोचमध्ये प्रवाशांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत स्टेशन परिसरातूनच संशयाच्या आधारे पाच जणांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरी केल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपींमध्ये टोळीचा म्होरक्या शेख पिरू शेख सईद हा सुरत (गुजरात) येथील रहिवासी आहे. त्याच्या इतर चार सहकाऱ्यांमध्ये विरागुद्दीन चांद शहा, राहुल सुरेश पाटील, अनिल सुरेश उनाटे आणि शेख वसीम शेख अयुब यांचा समावेश आहे.

पोलिसांनी या आरोपींकडून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींनी दिलेल्या माहितीनंतर, मोबाईल फोन आणि रोख रकमेसह १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement