नागपूर : शहरातील पोलीस मुख्यालयात आज २९ जानेवारीला बुधवारी तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृताचे नाव रामचंद्र नानाजी रोहनकर असे असून काही दिवसांपूर्वी त्यांना नौकरीवरून बडतर्फ करण्यात येत असल्याचे नोटीस बजावण्यात आले.बडतर्फीची सूचना मिळाल्यापासून रोहनकर हे अस्वस्थ होते.
या कठोर पावलामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, मानसिक ताण हे कारणीभूत असल्याचा संशय आहे.याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून सविस्तर तपास सुरु केला.