Published On : Mon, Sep 1st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांचे ‘ऑपरेशन यू टर्न’;रस्ते अपघात मृत्यूंमध्ये घट, वाहतूक शिस्तीची जाणीव वाढली

नागपूर-शहरातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन यू टर्न’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली १० जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे केवळ अपघातांमध्येच घट झाली नाही, तर वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेविषयीची जाणीवही नागरिकांमध्ये वाढली आहे.

अपघात व मृत्यूंमध्ये घट-

जानेवारी ते ऑगस्ट २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये रस्ते अपघातांमुळे मृत्यूंची संख्या २५३ वरून १९५ इतकी कमी झाली आहे. म्हणजेच मृत्यूंमध्ये तब्बल ६० जणांनीघट झाली आहे. प्राणघातक अपघातांची संख्या २३८ वरून १६५ वर आली असून गंभीर जखमींची संख्या देखील घटून ४३६ वरून ४१७ झाली आहे.

झोननिहाय बदल-

झोननिहाय पाहता, अजनी (-४०%)साखरदरा (-३९%)सिताबर्डी (-३६%)कंप्टी (-२९%) यांसारख्या भागांत मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. मात्र कॉटन मार्केट झोनमध्ये मृत्यूंमध्ये १२०% वाढ नोंदवली गेली आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नाकाबंदी व दारू तपासणी-

‘ऑपरेशन यू टर्न’ अंतर्गत शहरातील ३३ ठिकाणी दररोज रात्री नाकाबंदी केली जाते. यामध्ये संध्याकाळी ७ ते पहाटे २ या वेळेत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाते. मोहिमेपासून आतापर्यंत २,५०० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई झाली असून त्यांच्या वाहनांची जप्ती करण्यात आली आहे.

बेफाम व अल्पवयीन वाहनचालकांवर धडक कारवाई-

  • सरासरी ६० पेक्षा अधिक बेफाम वाहनचालकांवर दररोज गुन्हे दाखल होतात.
  • अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणाऱ्या ५० हून अधिक पालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे.

अपघातप्रवण क्षेत्रांवर उपाययोजना-

पोलिसांनी शहरातील अपघातप्रवण भागांमध्ये बॅरिकेड्स, रंबलर्स, ब्लिंकर्स व ‘अपघातप्रवण क्षेत्र’ फलक लावले आहेत. यामुळे वाहनचालक अधिक सतर्क झाले असून अपघातांची शक्यता कमी झाली आहे.

पार्किंग व फूड ट्रकांवर कारवाई-

  • एनएमसीसोबत समन्वयाने पार्किंग-नो पार्किंग झोन निश्चित केले जात आहेत.
  • अनधिकृत फूड ट्रक व बदललेल्या वाहनांवर २५ हून अधिक कारवाई करण्यात आली आहे.
  • खासगी प्रवासी बस पार्किंगवर बंदी घालून ४५ बसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांची कडक देखरेख-

वाहतूक पोलिसांनी स्मार्ट ट्रॅफिक बूथमधून सक्रियपणे काम करणे बंधनकारक केले आहे. अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होत असून त्यामुळे सार्वजनिक विश्वास वाढला आहे.

एकूण परिणाम-

या मोहिमेमुळे

  • रस्ते अपघात व मृत्यूंमध्ये घट,
  • दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांमध्ये भीती,
  • पार्किंग व्यवस्थेत सुधारणा,
  • रस्त्यांवरील बेकायदेशीर वाहनांचा बंदोबस्त,
    असा एकूणच सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले की, “‘ऑपरेशन यू टर्न’ ही फक्त कायदा अंमलबजावणी नसून नागपूरकरांमध्ये रस्ते सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्यासाठी सुरू झालेली नागरी चळवळ आहे. ही मोहीम आणखी जोमाने पुढे राबवली जाईल.

Advertisement
Advertisement