नागपूर : नवरात्र उत्सवात महिलांची आणि मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘दुर्गा मार्शल’ या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त रश्मिता राव यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत महिला पोलिस कर्मचारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत शहरात गस्त घालणार आहेत. प्रत्येक टीममध्ये दोन महिला पोलिस असतील, ज्या मोपेडवरून गरबा–डांडिया स्थळे, मंदिरे, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे येथे सुरक्षा पाहणी करतील.
पोलिसांचे हे पाऊल महिलांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्याबरोबरच समाजात विश्वास निर्माण करण्यास आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यास उपयुक्त ठरणार आहे.
Advertisement








