Published On : Tue, Aug 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा ‘कृती आराखडा’; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

तंत्रज्ञान, गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईवर भर
Advertisement

नागपुर की अपराध रोकथाम के लिए पुलिस का ‘एक्शन प्लान’; नागरिकों को सुरक्षित, सक्षम और त्वरित पुलिस सेवा देने का आयुक्त विश्वास नांगरे पाटील का संकल्प

नागपूर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि तत्पर पोलीस सेवा देण्यासाठी नागपूर पोलिसांनी व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. वाहनचोरी, घरफोडी, शरीराविरुद्धचे गुन्हे, साखळी चोरी, सायबर फसवणूक, महिला व बालकांची सुरक्षा, अवैध व्यवसाय, वाहतूक व्यवस्था तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पोलिसांच्या आगामी धोरणाची माहिती दिली. नागपूर शहराची लोकसंख्या मोठी असताना उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही, गस्त, नाकाबंदी आणि गुन्हेगारांच्या नोंदींचे विश्लेषण यांचा प्रभावी वापर करून गुन्हे रोखण्यावर भर दिला जाणार आहे. गुन्हा घडल्यानंतर तपास करण्याबरोबरच तो घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक पोलिसिंग मजबूत करण्याचा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला.

वाहनचोरी आणि घरफोडींवर विशेष लक्ष-
शहरातील वाहनचोरी, घरफोडी आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवणे, त्यांची माहिती अद्ययावत करणे आणि पोलीस ठाणेनिहाय गुन्ह्यांच्या पद्धतीचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

नागपुर की अपराध रोकथाम के लिए पुलिस का ‘एक्शन प्लान’; नागरिकों को सुरक्षित, सक्षम और त्वरित पुलिस सेवा देने का आयुक्त विश्वास नांगरे पाटील का संकल्प

Advertisement

नागपुर की अपराध रोकथाम के लिए पुलिस का ‘एक्शन प्लान’; नागरिकों को सुरक्षित, सक्षम और त्वरित पुलिस सेवा देने का आयुक्त विश्वास नांगरे पाटील का संकल्प

सायबर गुन्ह्यांविरोधात विशेष मोहीम-
ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट दुवे आणि डिजिटल माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर विभाग अधिक सक्षम केला जाणार आहे. गुन्ह्यांच्या तपासात तांत्रिक कौशल्य आणि डिजिटल पुराव्यांचा प्रभावी वापर करण्यासोबतच नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

महिला आणि बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य-
महिला आणि बालकांची सुरक्षा पोलिसांच्या कृती आराखड्यात अग्रक्रमावर आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढविणे, महिलांशी संबंधित गुन्ह्यांवर तातडीने कारवाई करणे आणि निर्भया पथक अधिक प्रभावी करण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये पॉक्सो कायद्यानुसार प्रभावी तपास करण्यावरही भर राहणार आहे.

साखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्ह्यांवर अंकुश- साखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी गस्त, नाकाबंदी आणि संशयितांची तपासणी वाढविली जाणार आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने गुन्हेगारांची ओळख पटविण्यासोबतच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

नागपुर की अपराध रोकथाम के लिए पुलिस का ‘एक्शन प्लान’; नागरिकों को सुरक्षित, सक्षम और त्वरित पुलिस सेवा देने का आयुक्त विश्वास नांगरे पाटील का संकल्प

नागपुर की अपराध रोकथाम के लिए पुलिस का ‘एक्शन प्लान’; नागरिकों को सुरक्षित, सक्षम और त्वरित पुलिस सेवा देने का आयुक्त विश्वास नांगरे पाटील का संकल्प

अवैध व्यवसायांवर कारवाई सुरूच-
हुक्का केंद्रांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर आणि अवैध व्यवसायांवर कारवाई सुरूच राहणार आहे. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या गैरप्रकारांवर कठोर भूमिका घेतली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

सणांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त-
आगामी सण आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गस्त आणि नाकाबंदी वाढविण्यासोबतच कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेलाही समान महत्त्व दिले जाणार आहे. आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवरही लक्ष- आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलीस घटनास्थळी किती वेळात पोहोचले, आवश्यक मदत मिळाली का आणि तक्रारीवर योग्य पद्धतीने कार्यवाही झाली का, याचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामुळे पोलीस प्रतिसाद यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यास मदत होणार आहे.

सीसीटीव्हीचा प्रभावी वापर-
शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा गुन्हे नियंत्रण आणि तपासासाठी अधिक प्रभावी वापर केला जाणार आहे. गुन्ह्यानंतर आरोपीचा माग काढण्याबरोबरच संशयास्पद हालचालींची माहिती मिळविण्यासाठीही सीसीटीव्हीचा वापर वाढविण्यात येणार आहे.
वाहतूक व्यवस्थेवरही विशेष भर- शहरातील वाहतूक कोंडी, वाहनतळ, सिग्नल व्यवस्था आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही उपाययोजना केल्या जाणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच प्रलंबित दंडाची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

नव्या पोलीस ठाण्यांना गती-
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पिंपळा, भिलगाव, कळमना बाजार यांसह अन्य भागांत नवीन पोलीस ठाण्यांची गरज अधोरेखित करण्यात आली. नवीन पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक निधी, प्रशासकीय मान्यता, वाहने आणि इतर सुविधांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पोलीस आयुक्तांनी आभार मानले.

पोलिसांच्या कामगिरीचे सातत्याने मूल्यमापन-
तक्रार नोंदविण्यापासून तिचे निराकरण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन केले जाणार आहे. नागरिकांच्या फोननंतर पोलीस वेळेत पोहोचले का, तक्रार योग्य प्रकारे नोंदविण्यात आली का आणि आवश्यक मदत मिळाली का, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

‘गुन्हेगारी कमी करणे हेच प्रमुख लक्ष्य’-
नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी करणे हे पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. प्रतिबंधात्मक कारवाई, तंत्रज्ञानाचा वापर, गुन्हेगारांच्या नोंदींचे विश्लेषण आणि उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन यांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकूणच, नागपूर पोलिसांचा हा कृती आराखडा गुन्हा घडल्यानंतरच्या कारवाईपुरता मर्यादित न राहता गुन्हे रोखणे, तातडीने प्रतिसाद देणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक मजबूत करणे यावर केंद्रित असणार आहे.

रविकांत कांबळे

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.