Published On : Thu, Jun 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांत मोठे फेरबदल; 31 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी!

Advertisement

नागपूर : नागपूर शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी 31 पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्यांचे आदेश गुरुवारी जारी केले. नागपूर शहर घटकस्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनंतर या बदल्या करण्यात आल्या असून, विविध पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये सोनेगाव, वाडी, बेलतरोडी, कोतवाली, गिट्टीखदान, यशोधरानगर, सक्करदरा, पारडी, वाठोडा, जुनी कामठी, भांडेवाडी आणि लकडगंज पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. तसेच गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, मानव संसाधन शाखा, नियंत्रण कक्ष आणि वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनाही नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बदल्यांमध्ये सोनेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांची वाडी येथे, तर वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांची आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांची कोतवाली येथे बदली करण्यात आली असून, गुन्हे शाखेतील ललिता तोडासे यांच्याकडे गिट्टीखदान पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय वाहतूक विभाग, गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांमधील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे शहरातील पोलीस प्रशासनात नव्या कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges