नागपूर : नागपूर शहर पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या व नव्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. नागपूर शहर घटकस्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन आदेशानुसार नाशिक ग्रामीण येथून नागपूर शहरात बदलीवर आलेले आदित्य मिरखेलकर यांची पोलीस उपायुक्त, वाहतूक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथून बदलीवर आलेल्या अन्नपूर्णा सिंह यांच्याकडे परिमंडळ-२ ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची परिमंडळ-५ येथे बदली करण्यात आली असून मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्याकडे गुन्हे (डिटेक्शन) विभागाची धुरा देण्यात आली आहे. तर गुन्हे (डिटेक्शन) विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांची मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
या फेरबदलामुळे नागपूर शहर पोलिसांच्या विविध महत्त्वाच्या विभागांना नवे नेतृत्व मिळाले आहे. कायदा व सुव्यवस्था, गुन्हे तपास आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे बदल महत्त्वाचे मानले जात असून नव्या अधिकाऱ्यांपुढे त्यांच्या विभागांतील आव्हानांना सामोरे जाण्याची जबाबदारी असणार आहे. शहर पोलीस दलातील या बदल्यांकडे प्रशासकीय वर्तुळात विशेष लक्ष लागले आहे.
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...



