Published On : Wed, Mar 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात स्टंटबाजांवर पोलिसांचा वचक; तरुणाला पाठलाग करून पकडले!

Advertisement

नागपूर : शहरात वाढत्या स्टंटबाजी आणि रॅश ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. Nagpur Police Unit 5 पथकाने वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान रोडवर मोटारसायकलवर धोकादायक स्टंट करत तसेच बेदरकार वाहन चालवत असलेल्या एका तरुणाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

कारवाईनंतर संबंधित तरुणाला स्वामीनारायण मंदिर परिसरातील नाकाबंदी ठिकाणी आणण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पारडी ट्रॅफिक विभागाच्या अमलदारांच्या ताब्यात देण्यात आले.

Gold Rate
Mar 2nd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,67,000/-
Gold 22 KT ₹ 1,55,300/-
Silver/Kg ₹ 2,87,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचे नाव सुरज सिंग विक्रम सिंग (वय २० वर्षे, रा. लाल गोडाऊन, जरीपटका) असे असून त्याच्याविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

होळीच्या पार्श्वभूमीवर शहरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, स्टंटबाजी, रॅश ड्रायव्हिंग आणि ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात ‘युनिट 5’कडून कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement