नागपूर : घरकामासाठी गरीब कुटुंबाकडून विकत घेतलेल्या ११ वर्षीय मुलीचा अमानुष छळ करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी हुडकेश्वर पोलिसांचे पथक बंगळुरूला रवाना झाले. हिना खान असे या महिला आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात, हिनाचा पती अरमान खान आणि विकृत भाऊ अझहर शेख याला यापूर्वीच अटक झाली आहे.
अरमानची पत्नी हिना ही सध्या २ वर्षांची आणि ८ महिन्यांच्या मुलींसह बेंगळुरूमध्ये आहे. दरम्यान अरमान परतताच नागपूर विमानतळाहून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याचा मेहूणा अझहर शेख याला जामिनासाठी धडपड करण्यासाठी न्यायालयात पोहोचल्यानंतर अटक केली. आता अरमानची पत्नी हिना हिच्या अटकेसाठी हुडकेश्वर ठाण्याचे एक पथक बेंगळुरूला रवाना झाले आहे.