– एका महिलेची सुटका
नागपूर: नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत हुडकेश्वर परिसरात मोठी कारवाई केली. संत ताजेश्वर नगर, शिवशंकर मंदिरासमोर असलेल्या घरावर छापा टाकून पोलिसांनी देहव्यापाराचा जाळा उखडून टाकला.
या कारवाईत सुनिता विकास कांबळे (वय 46) आणि यश विकास कांबळे (वय 26) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी पीडित महिलेला कमी वेळात अधिक आर्थिक फायदा मिळवून देण्याचे प्रलोभन देऊन तिला देहव्यापार करण्यास भाग पाडत होते. पोलिसांच्या छाप्यादरम्यान एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून तिला वैद्यकीय तपासणीतून पाठपुरावा करण्यात आला आहे.
या कारवाईत रोख रक्कम 63,500 रुपये, चार मोबाईल फोन (किंमत अंदाजे 31,000 रुपये) आणि 20 नग कंडोम (किंमत 200 रुपये) असा एकूण 94,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींच्या विरोधात गुन्हा क्र. 542/2025, कलम 143(2)(3) BNS, RW 3,4,5,7 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत नोंद करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून नागपूर पोलिसांनी मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाविरुद्ध ठोस पाऊल उचलल्याचे दिसून आले आहे.