
नागपूर : पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या 20व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात नागपूर शहर पोलीस दलाने आपली छाप सोडत राज्यात ‘अवल क्रमांक’ पटकावला आहे. या स्पर्धेत नागपूर दलाने तब्बल 15 पदके (6 सुवर्ण, 5 रौप्य, 4 कास्य) आणि 3 मानाच्या ट्रॉफ्या जिंकत संपूर्ण राज्यात आपल्या व्यावसायिक कौशल्याची पुन्हा एकदा दखल घेतली.
ही राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 व 2 यांच्या वतीने रामटेकडी, पुणे येथे 15 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान पार पडली.
नागपूर दलाची विजयी कामगिरी-
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचा संघ 27 सदस्यीय होता — 5 अधिकारी, 22 महिला अंमलदार आणि रेवन व मॅक्स हे 2 प्रशिक्षित श्वान या चमूमध्ये सहभागी झाले होते. या मेळाव्याचा उद्देश पोलीस दलाच्या तांत्रिक, वैज्ञानिक आणि तपास कौशल्यात अधिक वाढ घडवून आणणे हा होता.
या मेळाव्यात Scientific Aid to Investigation, Police Photography, Videography, Anti-Sabotage Check, Computer Awareness आणि Dog Squad अशा सहा विभागांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करीत राज्यात सर्वोच्च स्थान मिळवले. यासाठी नागपूर पोलीस दलाला General Championship Trophy, Scientific Aid to Investigation Trophy आणि CID Centenary Trophy या मानाच्या ट्रॉफ्या प्राप्त झाल्या.
विजेते अधिकारी आणि अंमलदार-
- पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे – फॉरेन्सिक सायन्स, क्राईम इन्व्हेस्टिगेशन, मेडिको-लीगल आणि फिंगरप्रिंट विभागात एकूण 4 पदके (1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कास्य)
- पोलीस हवालदार पलाश वाघमारे – कम्प्युटर अवेअरनेस मध्ये 2 सुवर्ण
- महिला अंमलदार प्रतीक्षा नागपुरे – ऑब्झर्वेशन आणि पोर्ट्रेट टेस्ट मध्ये 2 सुवर्ण
- अंमलदार कृणाल उके – कम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये 1 सुवर्ण
- महिला उपनिरीक्षक अपूर्वा बोरकर – फॉरेन्सिक सायन्स व फिंगरप्रिंट मध्ये 2 रौप्य
- हवालदार प्रदीप शिरसे – पोलीस फोटोग्राफी मध्ये 1 रौप्य
- हवालदार रसिका घायवट – पोलीस पोर्ट्रेट टेस्ट मध्ये 1 कास्य
- महिला सहाय्यक निरीक्षक अश्विनी काळे – लिफ्टिंग, पॅकेजिंग आणि फॉरेन्सिक सायन्स मध्ये 2 कास्य
प्रशिक्षकांचा गौरव-
या स्पर्धेसाठी सातत्याने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
फॉरेन्सिक क्षेत्रात डॉ. आशिष बढीये व डॉ. नीती कपूर, मेडिको-लीगल साठी डॉ. अनिंद्या मुखर्जी, फॉरेन्सिक मेडिसिन साठी डॉ. मंदार साने व डॉ. हंसी बंसल (एम्स, नागपूर), कम्प्युटर अवेअरनेससाठी श्रीकांत अर्धापूरकर, फिंगरप्रिंट साठी सहाय्यक निरीक्षक प्रवीण मून, तर फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी साठी अमोल सहारे, बळीराम रेवतकर आणि दीपक बुलबुले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रेरणादायी सत्कार सोहळा-
या गौरवशाली यशाचा सन्मान करण्यासाठी पोलीस भवन, नागपूर येथे विशेष सत्कार सोहळा पार पडला. या वेळी आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत म्हटले.राज्यस्तरावर अवल क्रमांक मिळवणे हे नागपूर पोलीस दलासाठी गौरवाचे यश आहे. मागील वेळी मिळवलेल्या 9 पदकांवरून यंदा 15 पर्यंत झेप घेणे ही आपल्या प्रगतीची खूण आहे. पुढील वर्षी आणखी उत्तम कामगिरी करूया.”
या कार्यक्रमाला सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त वसंत परदेशी, डॉ. शिवाजी राठोड, राजेंद्र दाभाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








