नागपूर: पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याची गंभिरता लक्षात घेता पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी शहरातील प्रमुख कंत्राटदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शहरातील वाहतूक व्यस्थेत काही बदल करण्यात आले
सदर वाहतूक विभाग-
1. कॅफे हाऊस चौक ते मेश्राम पुतळा – तसेच – सदर मंगळवारी ते पाटणी ऑटोमोबाईल दरम्यान अतिक्रमणची कारवाई करण्यात आली. हात ठेले काढण्यात आले.
2. बोरगाव ते गोरेवाडा तसेच पुरुषोत्तम बाजार ते झेंडा चौक झिंगाबाई टाकळी – रस्ता सिमेंटीकरण बॅरिकेट्स लावलेले नाही रिफ्लेक्टर आणि सूचनांचे फलक लावलेले नव्हते नव्हते. याबाबत संबंधित ठेकेदार यांना साय. ४.०० वाजेपर्यंत पूर्ण करण्याची समज देण्यात आली.
3. एलआयसी चौक डबल डेकर उड्डाणपुलाचे काम चालू आहे कामाच्या ठिकाणी बॅरिकेट रिफ्लेक्टर लावले नव्हते सदर ठिकाणी ठेकेदार यांना सांय.४.०० वाजेपर्यंत काम करण्याची समज देण्यात आली.
वाहतूक एमआयडीसी –
1. वाडी टी पॉइंट येथे रोडचे काम चालू आहे ठेकेदार यांनी बॅरिकेट लावलेले नव्हते तसेच मार्शल लावले नव्हते बॅरिकेटिंग व दोन शिफ्ट मध्ये मार्शल लावण्याबाबत सूचना देण्यात आल्यात.
वाहतूक अजनी –
1. पुरुषोत्तम बाजार ते शताब्दी चौक या ठिकाणी वन साईडचे बांधकाम झालेले आहे दुसरी साईड बांधकाम अपूर्ण आहे. माननीय पोलीस आयुक्त यांनी सदर रोड कन्स्ट्रक्शन साईड बाबत डॉक्युमेंट चेक करण्याबाबत सूचना देण्यात आली होती याबाबत पीआय अजनी वाहतूक रितेश आहेर यांनी डॉक्युमेंट चेक केले आहे. DFSL Company Shri. Pohani यांच्याशी चर्चा केली त्यांनी सदर ठिकाणी बॅरिकेट्स लावले तर पाणी तुंबून पलीकडे जनावर अथवा एखादा दारुडा व्यक्ती याला इजा होण्याची शक्यता आहे असे कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले याकरिता बांबू लावून पट्टी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि रिफ्लेक्टर लावलेले आहे असं स्पष्टीकरण दिले.
वाहतूक कामठी –
1. चिखली चौक ते डिप्टि सिग्नल दरम्यान उड्डाणपुलाचे व रोडचे सिमेंटचे काम चालू आहे सदर ठिकाणी बॅरिकेटिंग केलेली नाही रिफ्लेक्टर लाईट सूचनाफलक लावली नाही याबाबत पूर्तता करण्याबाबत सूचना दिल्यात. तसेच रस्त्यावर वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टरच्या कामामुळे येणारी माती रेती याची साफसफाई करणे व खड्डे बुजवण्याबाबत समाज दिली सूचनाफलक लावण्याबाबत अन्सारी Erectors कंपनी करत आहे.
2. हनुमान मंदिर चौक ते भांडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान उड्डाणपुलाचे व रोडचे सिमेंट काम चालू आहे सदर ठिकाणी बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर लाईट सूचनाफलक माती रेती साफसफाई करणे गड्डे बुजवण्याबाबत JP enterprises या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर यांना समज देण्यात आली.
3. एचबी टाउन चौक ते प्रजापती चौक दरम्यान उड्डाणपूल व रोडचे सिमेंटरीकरण चे काम चालू आहे सदर ठिकाणी बॅरिकेट रिफ्लेक्टर लाइट सूचनाफलक लावणे व माती रेती साफसफाई खड्डे बुजवण्याबाबत GDCL कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर यांना समज देण्यात आली.
4. कामठी रोड ते आशा हॉस्पिटल इथपर्यंत मेट्रोचे काम चालू आहे बॅरिकेट्स लाईट स्पीड लिमिट गार्ड ब्रेकर इत्यादी कामकाज करण्याबाबत कॉन्ट्रॅक्टर यांना समज देण्यात आली.
5. भारत नगर ते डीपी सिग्नल रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे सदर ठिकाणी बॅरिकेट साइन बोर्ड लावण्यात आलेले आहे.
6. हनुमान मंदिर चौक ते भांडेवाडी रेल्वे स्टेशन रोडचे सिमेंटचे काम सुरू आहे सुरक्षा पोल उभारून रस्त्यावरील रेते मटेरियल उचलून घेण्यात आलेले आहे.
वाहतूक सोनेगाव –
1. पडोळे चौक चे पाईपलाईनची पाहणी केली कामाचे साहित्य रस्त्यावर अस्तव्यस्त पडलेले होते रस्त्यावर अडथळा निर्माण होत होता कॉन्ट्रॅक्टर करून अडथळा दूर करण्यात आला.
2. लक्ष्मी नगर चौक पेपर ब्लॉकचे काम सुरू आहे सदर ठिकाणी बॅरिकेटिंग कॉन्ट्रॅक्टर यांनी लावलेली आहे लावून घेण्यात आली.
3. चीज भवन कुलिया येथे रेल्वे ग्रुपच्या वर रोडचे पॅचेस ची दुरुस्तीचे काम सुरू आहे कॉन्ट्रॅक्टर यांनी कुठल्याही प्रकारची सूचना दिली नव्हती सदरचे काम रेल्वे विभागातर्फे करण्यात आल्याबाबत वाहतूक पिया यांना सांगण्यात आले सदर ठिकाणी बॅरिगेटिंग लावून घेण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळी ब्लिंकर्स आणि रिफ्लेक्टर लावण्याबाबत कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना देण्यात आलेल्या आहे.
4. पडोळे चौक प्रताप नगर यादरम्यान रस्त्याचे बांधकामाचे मटेरियल कॉलनीमध्ये जाणाऱ्या रस्त्यांमध्ये टाकण्यात आले होते याबाबत कॉन्ट्रॅक्टरला ते हटविण्यासाठी काल सूचना दिल्या असता त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर यांनी बऱ्यापैकी मटेरियल बाजूला केलेले आहे तसेच बॅरिकेटिंग देखील लावण्यात आलेली आहे.
5. त्रिमूर्ती नगर टी पॉइंट ते गजानन नगर यादरम्यान बॅरिकेट्स रोड बांधकामाच्या दरम्यान लावलेले नव्हते कामाच्या ठिकाणी सुरक्षा झाली लावलेली नव्हती सदर दोन्ही बाबीची पूर्तता कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेली आहे.
6. गजानन मंदिर टी पॉइंट येथे नाली दुरुस्तीचे काम आहे त्या ठिकाणी दोन बॅरिकेट लावलेले होते परंतु अजूनही बॅरिकेटची आवश्यकता होती त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना दिलेल्या आहे मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्स नव्हते ते लावण्याबाबत कॉन्ट्रॅक्टरला कळविण्यात आलेले आहे सदरचे काम हे तीन ते चार दिवसांमध्ये कम्प्लीट होईल असे कॉन्ट्रॅक्टर यांनी समक्ष वाहतूक पोलीस निरीक्षक यांना सांगितलेले आहे.
7. मंगलमूर्ती चौक ते जयताळा मार्केट चौक यादरम्यान कामाची पाहणी केली अर्धवट सोडलेले बांधकाम आहे संबंधित इंजिनियर यांना संपर्क केला सदर ठिकाणी आवश्यक व त्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना देण्यात आल्या.
8. अंबाझरी पुलाचे कामाची पाहणी केली तिथे काम चालू आहे परंतु कामाचा वेग थोडा कमी असल्याचे जाणवले आणि सदरच्या एका बाजूला ब्रिजचे काम 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल परंतु दोन्हीही ब्रिज सुरू होण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर यांनी डिसेंबर शेवटपर्यंत आठवडा लागेल असे इंजिनीयर व कॉन्ट्रॅक्टर यांनी वाहतूक पोलीस निरीक्षक यांना सांगितले.
वाहतूक सीताबर्डी विभाग –
1. हम्प यार्ड रोडचे काम जवळपास पूर्ण झाले असून या आठवड्यात रोड वाहतुकीस सुरू करणार आहे काही ठिकाणी बॅरिकेट नसल्याने संध्याकाळपर्यंत पूर्तता करण्याबाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना देण्यात आल्या आहे.
2. लॉ कॉलेज चौक ते कॅम्पस चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम चेक केले सर्व ठिकाणी मार्शल बॅरिकेट ब्लींकर दिसून आले परंतु कंत्राटदारांच्या नावाचे फलक मोबाईल नंबर व कालावधीचे बॅनर फलक लावले नसल्याने सदर पूर्तता कॉन्ट्रॅक्टर यांना करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या तसेच आरटीओ कटिंग येथे ब्लाइंड टर्न होत असल्याने तात्काळ मार्शल व ब्लींकर लावण्या बाबत कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना करण्यात आली.
कॉटन मार्केट वाहतूक शाखा –
1. अशोक चौक ते भोला गणेश चौक इथपर्यंत व अशोक चौक ते गोळीबार चौक रोडचे काम सुरू आहे खोदकाम केलेले आहे दोन्ही बाजूला बॅरिकेट कॉन्ट्रॅक्टरनी लावलेले आहे लाल आणि पिवळा रंगाची रेडियम पट्टी लावण्याबाबत संबंधित कंत्राटदार यांना सूचना दिल्या आहेत उद्यापर्यंत लावून घेण्याचे आश्वासन कंत्राटदार यांनी दिलेले आहे.
2. महाल रोड ते गांधी गेट या रोडवर गांधी गेट येथे रस्त्याचे बांधकाम चालू असल्याने महल चौक येथे बॅरिकेट कॉन्ट्रॅक्टर यांनी लावलेले आहे.
3. शुक्रवारी तलाव येथे सौंदर्य करण्याचे काम सुरू आहे 15 ऑगस्ट पूर्वी काम संपवायची आहे सदर ठिकाणी लोखंडाचे पत्रे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावलेले आहे.
लकडगंज वाहतूक-
1. अन्सारी इरेक्टर्स कंपनीचे लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगर पावर हाऊस चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम चालू आहे त्या ठिकाणी पाहणी केली असता कॉन्ट्रॅक्टर यांनी बॅरिकेटिंग केलेले आहे रिफ्लेक्टर लाईट सूचनाफलक यांची व्यवस्था केली नव्हती पूर्तता करण्याबाबत कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना दिल्या आहेत तसेच रस्त्यावर वेळी वेळी त्यांच्या कामामुळे येणारे माती रेती यांची साफसफाई करणे व खड्डे बुजवण्याबाबत कंत्राटदार यांना समज देण्यात आलेली आहे.
2. जी डी सी एल यांचे वैष्णव देवी चौक ते प्रजापती चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम चालू आहे त्या ठिकाणी पाहणी केली असता पुरेसे बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर लाईट तसेच सूचनाफलक लावलेले नव्हते तरी ती व माती साफसफाई खड्डे बुजवणे इत्यादी सूचना कंत्राटदार यांना देण्यात आलेली आहे.
वाहतूक इंदोरा शाखा –
1 .ऑटोमोटिव्ह चौक ते यशोधरा नगर दरम्यान उसी डब्ल्यू चे पाईपलाईनचे काम चालू आहे सूचना दिल्याप्रमाणे कंत्राटदारांनी आज रेडियम पट्टी आणि बॅरिकेट्स लावलेले आहे.