छत्रपती संभाजीनगर: दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लावल्याची माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या होत्या. मात्र त्या इ-रिक्षा खराब होत्या अशी तक्रार दिव्यांगांनी बच्चू कडू यांच्याकडे केली.
त्यामुळे बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी रिक्षा पाहण्यासाठी बोलावले होतं. मात्र कंपनीने माहिती नसलेल्या एक कर्मचारी पाठवला. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच त्याच्यावर संतापले.तसेच त्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला असा सवाल कडू यांनी अधिकाऱ्याला केला.
या घटनेसंदर्भात कडू यांनी स्पष्टीकरण देत योजनेतून जवळपास 500 रिक्षांचे वाटप करण्यात आले, पैकी 250 ते 300 रिक्षा या खराब असल्याचे ते म्हणाले. कानाशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता, अशी माहितीही त्यांनी दिली.या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घेत याबाबत चौकशीची मागणीही त्यांनी केली.
धर्मांतरण के दबाव और शोषण का आरोप, सोनेगांव थाने में केस दर्ज.....
स्मार्ट मीटर पर शिवसेना-मनसे आमने-सामने.. #maharashtranews #smartmeter #latestnews
आशा वर्कर्स के सामूहिक इस्तीफे से संकट.. #maharashtranews #ashaworkers #latestnews
गोंदिया में 123 इमारतें बनीं खतरा.. #maharashtranews #gondiya #newsupdate
सपकाळ का भाजपा और केंद्र पर हमला.. #maharashtranews #congressvsbjp #politicsnews #latestnews
श्रीनगर में तिरंगा न होने पर नेहरु जिम्मेदार बोंडे.. #maharashtranews #anilbonde #amravati








