Published On : Thu, Nov 19th, 2020

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची बाधा

नागपूर: नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपली प्रकृती स्थिर असून, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

अमितेश कुमार विलगीकरणात असून, त्यांच्या कार्यालयाने कार्यालयातील कर्मचाºयांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. याआधी मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त पोलिस आयुक्त निलेश भरणे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.