Published On : Fri, Jul 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; संचालकाला अटक

Advertisement

नागपूर : शहरातील सदर परिसरातील छावणी चौक येथे स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा क्राइम ब्रँचच्या युनिट-1 ने पर्दाफाश केला. या कारवाईत स्पा सेंटरचा संचालक भूषण नरेशराव वाघमारे (31, रा. अजय नगर, अंबाझरी) याला अटक करण्यात आली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी चौकातील अचरज टॉवरच्या भूतळावर असलेल्या रेडियंट सलून अँड स्पामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती क्राइम ब्रँचला मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच पंचांच्या उपस्थितीत स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला.

Gold Rate
Aug 8 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,400 /-
Gold 22 KT ₹ 1,40,400 /-
Silver/Kg ₹ 2,31,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारवाईदरम्यान संचालक भूषण वाघमारे हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून बनावट ग्राहकासाठी वापरलेले ₹2 हजार, ग्राहकांकडून मिळालेले ₹1 हजार रोख, एक अँड्रॉइड मोबाईल, वापरलेले व सीलबंद निरोध, डीव्हीआर बॉक्स तसेच अन्य साहित्य असा सुमारे ₹36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी व पीडित महिलांना पुढील कारवाईसाठी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Advertisement

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 143(2) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम 3, 4, 5 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

क्राइम ब्रँचने शहरातील स्पा, मसाज सेंटर आणि तत्सम आस्थापनांच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशीर देहव्यापाराविरोधातील विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam #apkscam #news

KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...

मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack  #CrimeNews #MaharashtraCrime

मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime

मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर

मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर

वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha #newsupdate #news

वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...

नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha #nagpurnews

नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...

रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra

रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges