Published On : Fri, Jul 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वर्ध्यात १२ वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; आरोपीला अटक

Advertisement

वर्धा : वर्धा शहरालगतच्या सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोठा शिवारात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल राजू मडावी (३०, रा. रोठा) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हत्या आणि पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक कुटुंब रोठा परिसरातील शेतात सालदार म्हणून वास्तव्यास आहे. त्यांची १२ वर्षीय मुलगी रोठा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती. शाळेतून घरी परतल्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यावर मोठा दगड टाकून तिची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Gold Rate
Aug 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,900 /-
Gold 22 KT ₹ 1,42,800 /-
Silver/Kg ₹ 2,36,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सायंकाळी साडेसातच्या सुमारास मजुरीवरून परतलेल्या पालकांना मुलगी घरात दिसून न आल्याने त्यांनी शोध घेतला. घराजवळील शेत परिसरात ती गंभीर अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

या प्रकरणाच्या तपासासाठी १० पोलिस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. आरोपी राहुल राजू मडावी याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी हत्या आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement

या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Advertisement
SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news  #nagpurnews

SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news...

बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news

सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news

महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews #crimenews #accusedarrested

महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews...

बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ

बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ

राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges