Published On : Mon, Jul 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात भोंदू बाबाचा काळा चेहरा उघड; जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Advertisement

नागपूर : नागपुरात अंधश्रद्धा, जादूटोणा आणि नोकरीचे आमिष दाखवत एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी स्वतःला धर्मगुरू म्हणून भासवणाऱ्या संजय रामदास शिरोडे (वय 50) याला अटक केली आहे. आरोपीने विशेष पूजा करून मुलाला नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर गुन्हा केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकडोजी चौक येथील एमएसईबी कार्यालयात चौकीदार म्हणून कार्यरत आहे. उपनिबंधक कार्यालयात त्याची पीडितेच्या पतीशी ओळख झाली होती. त्यावेळी त्यांच्या 21 वर्षीय मुलाला माथाडी कामगार म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

27 जून रोजी आरोपी पूजेचे साहित्य घेऊन पीडितेच्या घरी पोहोचला. पूजा सुरू असताना त्याने पीडितेचा पती आणि मुलाला झाडांच्या मुळ्या आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले. घरात महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर नोकरी, आर्थिक प्रगती आणि अपूर्ण कामे पूर्ण करून देण्याचे आमिष दाखवत आरोपी महिलेवर दबाव टाकत राहिला. विरोध केल्यास पतीला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

भीतीपोटी पीडिता काही दिवस गप्प राहिली. मात्र, 5 जुलै रोजी आरोपीने पुन्हा संपर्क साधल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दाम्पत्याने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून, अशाच पद्धतीने इतर कोणालाही त्याने फसवले आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.