Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुर पोलिसांची मोठी कारवाई;70 ग्रॅम एमडी ड्रग्जसह आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील मोहिमेत नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने मोठी कारवाई करत इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसपेठ परिसरातून ७० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले असून ड्रग्जचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाला गस्तीदरम्यान सिरसपेठ परिसरात एमडी ड्रग्जची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागुलवार भवनामागील नाल्याजवळ सापळा रचून छापा टाकला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईत २२ वर्षीय लक्की मनपिया याला अटक करण्यात आली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान आरोपींकडून सुमारे ७० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्जची अंदाजे किंमत ७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याशिवाय आरोपींकडून तीन मोबाईल फोन, एक दुचाकी आणि ६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी ही एमडी ड्रग्ज महाल परिसरातील बॉबी मलिक याच्याकडून विकत घेतल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी बॉबी मलिक याचा शोध सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.