Published On : Fri, Jul 24th, 2015

नागपुर : पावनगांव ग्रा.पं. निवडणुकीसाठी 9 पैकी 8 उमेदवारांची बिनविरोध निवड


74 उमेदवार निवडणूक रिंगणात  

GRAM ELEC PHOTO
कामठी (नागपुर)।
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आगामी 4 ऑगस्टला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 9 गट ग्रामपंचायत च्या निवडनुकीसाठी एकूण 243 नाम निर्देशित सदस्यांपैकी 52 सदस्यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यामुळे 191 नामनिर्देशन अर्ज असून 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ज्यामध्ये पावनगांव ग्रामपंचायतीसाठी एकूण 3 प्रभागामधून 9 उमेदवार निवडून द्यायचे असून 8 उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुशल कार्याची प्रचिती देत भाजपाचे पदाधिकारी माजी जिप सदस्य अनिल निधान यांच्या प्रयत्नांना यश संपादन आले. यातून 9 पैकी 8 उमेदवारांचे बिनविरोध निवडून आल्यास यश आले. यानुसार लोणखैरी ग्राप 3, भामेवाडा ग्राप 2 असे एकूण तीन ग्राम पंचायतीच्या 13 उमेदवाराची बिनविरोध निवड करण्यात आली.

जाहीर निवडणूक कार्यक्रमनुसार तालुक्यातील कोराडी, लोणखैरी, घोरपड, महागांव,पावनगांव, खेडी,तेमसना, केसोरी, भामेवाडा या 9 ग्राप निवडणूका 4 ऑगस्ट ला होणार आहे. निवडणूक कार्यक्रम नुसार एकूण 31 वार्ड मिळून 191 उमेदवारी अर्ज असून 74 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांना बुधवारी निवडणूक चिन्ह वाटण्यात आले. यानुसार कोरडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 6 वार्डातील 16 उमेदवार निवडून येणार असून 43 सदस्यांनी नाम निर्देशन दाखल केले आहेत. लोणखैरी ग्राप निवडणुकीसाठी 3 वार्डासाठी 9 उमेदवार निवडून येणार आहेत. यातील अमोल दाभूजी मुसळे, वैशाली ज्ञानेश्वर झोडापे, नीलिमा अशोक बाळापुरे या 3 सदस्यांच्या विरोधात कुणीही नाम निर्देशित अर्ज न केल्याने या तिघांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यानुसार एकूण 9 उमेदवारांपैकी 3 उमेदवार बिनविरोध निवडणून आल्याने 6 उमेदवारांसाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत. घोरपड ग्राप निवडणुकी साठी एकूण 3 वार्डासाठी 9 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यासाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत. महालगावसाठी 11 उमेदवार निवडून द्यायचे असून यामध्ये 4 वार्डाचा समावेश होतो. यासाठी 30 उमेदवार रिंगणात आहेत. भामेवाडा ग्राप निवडणुकीसाठी 3 वार्डातून 7 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यातून वार्ड क्र. 1 मधून अर्जुन मंगळजी राउत या विरोधात कुणाचाही अर्ज नसल्याने बिनविरोध निवड करण्यात आले. यासाठी काँग्रेस चे यशपाल यासह अन्य पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांनी यश संपादन करण्यात मोलाची भूमिका निभावली तर या वार्डातून 2 उमेदवार निवडून आले. एकाची बिनविरोध निवड झाल्याने अन्य 1 जागेसाठी दोन महिला प्रतिनिधी उमेदवार आहे. त्याचप्रमाणे वार्ड. क्र. 3 मधून 2 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यासाठी सोमा उइके याची बिनविरोध निवडून द्यायचे आहे. यासाठी सोमा उइके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानुसार 3 वार्डातून एकूण 7 जागांपैकी 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने 5 उमेदवारांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.

खेडी ग्रा.पं. साठी 3 वार्डमिळून 9 उमेदवार निवडून द्यायचे आहेत यासाठी 26 उमेदवार निवडूक रिंगणात आहेत. टेमसना ग्रा.पं. साठी 3 वार्डातून 9 उमेदवार निवडून द्यायचे आहे. यासाठी 19 उमेदवार निवडणूक आहेत. केसोरी ग्रापंसाठी 3 वार्डातून 7 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यासाठी 15 उमेदवार निवडून रिंगणात आहेत. या निवडणुकीत अत्यंत चर्चेचा विषय ठरलेले पवनगाव ग्रा.पं. निवडणुकीसाठी 3 प्रभागातून 9 उमेदवार निवडून द्यायचे होते. मात्र जिप सदस्य अनिल निधन यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त होऊन 8 उमेदवार बिनविरोध निवड करण्यात आले. मात्र उमेदवार वामन पांडुरंग तडस व हरीश कारेमोरे यांची शेवटच्या वेळेपर्यंत विचारसरणी मांडणी आली नसल्याने शेवटी हे दोघेही सर्व साधारण प्रवर्गातून प्रतीस्पर्धा आहेत.

यासाठी एकूण 19 उमेदवार रिंगणात असून रामचंद्र मंगल खोडे, किरण धनराज राउत, वंदना कृष्णा सिंग, सीमा अनिल ठाकरे, दुर्गा विलास चांदेकर, ज्ञानेश्वर महागु पहेबावने, कविता नत्थू इरपाते, पूजा देविदास बागडे हे बिनविरोध निवड झाल्याने प्रभाग क्र. 3 ला 1 जागेसाठी सदर दोन उमेदवार प्रती स्पर्धा आहेत. या निवडणुकीत एकूण 31 वार्ड आहे. तर 10 हजार 850 पुरुष तर 10 हजार 48 महिला मतदार अशे एकूण 20, 895 हजार मतदाराचा हक्क बजविनार आहे. 87 उमेदवारांपैकी 13 उमेदवारचे 1 बिन विरोध निवड झाल्याने 74 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद आहेत. अशी माहिती तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी दिली.