नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापाराविरोधात नागपूर पोलिसांनी यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. “ऑपरेशन थंडर” अंतर्गत करण्यात आलेल्या या मोहिमेत एनडीपीएस प्रकरणांतील ३६ आरोपींची तपासणी करण्यात आली असून छापेमारीदरम्यान गांजाही जप्त करण्यात आला.
या विशेष मोहिमेचे नेतृत्व स्वतः पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी केले. यावेळी डीसीपी डिटेक्शन राहुल मकनिकर तसेच एसीपी क्राईम अभिजित पाटील हेही उपस्थित होते. पोलिसांच्या विविध पथकांनी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून संशयितांची चौकशी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस कायद्यांतर्गत पूर्वी नोंद असलेल्या ३६ आरोपींची सखोल पडताळणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान काही ठिकाणांहून गांजा जप्त करण्यात आला. संशयित आरोपींच्या घरांची कसून झडती घेण्यात आली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही आरोपी इतर गुन्ह्यांमध्ये आधीपासूनच कारागृहात असल्याची माहितीही समोर आली आहे.
कारवाईदरम्यान काही गुन्हेगारांशी संबंधित घरांमध्ये संशयास्पद अवैध बांधकाम आढळून आले असून त्याची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. अमली पदार्थांविरोधात “झिरो टॉलरन्स” धोरण अवलंबत अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सातत्याने राबवल्या जातील, असा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





