Published On : Tue, Aug 28th, 2018

नागपुरातील शास्वत शहरी गतीशीलतेवरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) व युरोपियन युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपुरातील ‘शाश्वत शहरी गतीशीलतेला प्रोत्साहन’ (प्रमोटींग सस्टेनेबल अर्बन मोबिलीटी इन नागपूर) या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे मंगळवारी (ता. २८) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,आयुक्त श्री. वीरेंद्र सिंह, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवने, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे लिड ट्रान्सपोर्ट स्पेशॅलिस्ट अर्नाड डॉफीन, भारताच्या युरोपियन युनियन प्रतिनिधी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक स्मिता सिंग, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट भारताच्या सहसंचालक क्लेमेन्स विडाल डी ला ब्लॅच, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प अधिकारी रजनीश अहुजा, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे ग्रँट ऑफिसर जतीन अरोरा, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटच्या संपर्क अधिकारी राधिका टाकरू यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, महा मेट्रो, नीरी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

उद्घाटनपर भाषणात महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहर स्मार्ट शहरांच्या यादीत आल्यापासून शहरतील विकास कामांना गती मिळाली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकार व एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट आणि युरोपियन युनियन सारख्या संघटनांनी मदतीचा हात दिल्याने नवनवीन प्रकल्प शहराच्या लौकीकात भर पाडण्यास सज्ज आहेत, असे त्या म्हणाल्या.

आयुक्त वीरेंद्र सिंह म्हणाले, शहरात विविध विकास काम, प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. ‘मोबिलाईज युवर सिटी’ उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नागपूर शहराची निवड करण्यात आली. या उपक्रमांतर्गत एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट व युरोपियन युनियनतर्फे नागपूर महानगरपालिकेला शहराच्या विकासासाठी तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि तंत्रज्ञानाची गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. महा मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे. मात्र सार्वजनिक वाहतुक साधनांचा वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणेही तेवढेच महत्वाचे आहे. लोकांची मानसिकता बदलल्याशिवाय कोणत्याही विकासाला मूर्तरूप येत नाही, असेही आयुक्त श्री. वीरेंद्र सिंह यावेळी म्हणाले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे लिड ट्रान्सपोर्ट स्पेशॅलिस्ट अर्नाड डॉफीन व भारताच्या युरोपियन युनियन प्रतिनिधी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक स्मिता सिंग यांनी केले. एएफडी व युरोपियन युनियनच्या सहकार्याने नागपूर शहराच्या विकासात मोठे परिवर्तन होईल, असा विश्वास भारताच्या युरोपियन युनियन प्रतिनिधी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक स्मिता सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. ‘मोबिलाईज युवर सिटी’ (एमवायसी) उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अहमदाबाद, कोची व नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे. नागपूर शहरात सुरू असलेली विविध विकास कामे प्रभावित करणारी आहेत, असे प्रतिपादन एएफडीचे लिड ट्रान्सपोर्ट स्पेशॅलिस्ट अर्नाड डॉफीन यांनी यावेळी केले.

कार्यशाळेमध्ये एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड यांनी सादरीकरणाद्वारे उपक्रमाची संकल्पना पटवून दिली. एमवायसी उपक्रमांतर्गत नागपूर शहरात होणारे परिवर्तन, सद्याच्या समस्या त्यावर उपाय आदींबाबत उपस्थित पदाधिका-यांमार्फत चर्चा केली. शहराच्या विकासाच्याबाबतीत उपस्थितांच्या मनातील संकल्पना त्यांनी मागवून त्यावर संवाद साधला. यावेळी मेट्रोतर्फे महेश गुप्ता यांनी सादरीकरण केले.

नागपुरातील शास्वत गतीशीतलतेबाबतच्या सहभागी सत्रामध्ये रस्त्यांचे व्यवस्थापन, सार्वजनिक परिवहन सुविधा व इलेक्ट्रॉनिक सुविधा, शहर विकासाबाबतचे नियोजन पद्धती आदीविषयी चर्चा झाली. यानंतरच्या सत्रात नागपुरातील एमवायसी उपक्रमासंर्भातील आराखडाबाबत विषयाशी संबंधित संस्थांची चर्चा करण्यात आली. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवने यांच्या भाषणाने कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे सत्राचा समारोप झाला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement