Published On : Tue, Jul 21st, 2020

रेतीघाटांवर मंत्र्यांच्या अचानकपणे धाडी गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री राऊत यांची धडक कारवाई

प्रशासकीय अधिकाèयांनाही माहिती न देता मंत्र्यांचे छापे
रेती माीयांचे कंबरडे माेडण्याचा निर्धार- देशमुख

नागपूर ः गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज अचानकपणे नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती घाटांवर धाडी टाकल्या. खापा येथील रेती घाटांजवळ माेठ्या प्रमाणावर रेतीचा साठा यावेळी आढळून आला. नागपूर जिल्ह्यात सुरू असलेला अवैध रेतीघाटाचा गाेरखधंदा बंद करण्यासाठी व रेतीमाीयांचे कंबरडे माेडण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उच्चअधिकाèयांना दिले.

गृहमंत्री व पालकमंत्र्यांनी सावनेर, रामटेक, कामठी व उमरेड या विधानसभा मतदारसंघातील पाेलीस स्टेशनला भेटी दिल्या.

यावेळी त्यांच्यासाेबत रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल व उमरेडचे आमदार राजू पारवे उपस्थित हाेते. गृहमंत्र्यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात रेतीचा अवैधपणे उपसा हाेत असल्याच्या तक्रारी मिळाल्या हाेत्या.

या तक्रारीची दखल घेऊन आज गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी या रेती माीयाचे सांम्राज्य उद्वस्त करण्याच्या इराद्याने आज संयुक्तपणे कुणालाही कुणकुण लागू न देता रेती घाटांवर छापे मारले. य रेती घाटावरील धडक कारवाईमुळे रेतीमाीयांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक रेती माीयांनी पळ काढल्याचे समजते. यावेळी नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियाेजनबद्ध अवैध रेती उपसाचा प्रकार उघडकीस आला.

गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर ग्रामीणचे पाेलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाèयांची बैठक आयाेजित केली हाेती. यात रेतीमाीयांच्या विराेधात झालेल्या कारवाईची माहिती विचारण्यात आली. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार मुंबईत असल्याने या कारवाईत सामील हाेऊ शकले नाही.

तेथूनच अधिकाèयांना घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी छापे अचानकपणे छापे मारण्याची सूचना केली. नागपुरातून मंत्र्यांचा काि\ला थेट सावनेर येथे पाेहाेचला.

सावनेर येथील पाेलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर दाेन्ही मंत्र्यांनी खापा येथील रेती घाटावर धाड मारली. यावेळी खापा येथील नदीच्या काठावर माेठ्या प्रमाणावर रेतीचा साठा असल्याचे दिसून आले. या नदीच्या काठावर माेठ्या प्रमाणावर खड्डे असल्याचे दिसून आले. रेती माीयांनी अवैधपणे केलेल्या रेती उपसामुळे झालेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाेन्ही मंत्र्यांनी कन्हान येथील रेती घाटावर धाड मारली. यावेळी माेठ्या प्रमाणावर रेतीचा साठा आढळून आला. या रेती माीयांचे कंबरडे माेडण्यासाठी एसडीओ व तहसीलदारांनी धडक कारवाई करावी, अन्यथा या अधिकाèयांची गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

या कारवाईत विभागीय आयुक्त संजयकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पाेलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पाेलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, खनिकर्म विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.

रेतीमाीयाचे कंबरडे माेडा- अनिल देशमुख
गेल्या काही वर्षांपासून रेतीमाीयांना संरक्षण मिळत असल्याने माेठ्या प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा हाेत आहे.

यामुळे शासनाचे नुकसान हाेत आहे त्याचप्रमाण पर्यावरणाची हानी हाेत आहे. जिल्ह्यातील रेती माीयांचे कंबरडे माेडण्याच्या सूचना अधिकाèयांना दिल्या आहेत. अधिकाèयांनी ही कारवाई न केल्यास त्यांच्यावर कठाेर कारवाी करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगलेच धारेवर धरले.कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा गृहमंत्र्यांनी यावेळी दिला.

महसूल पोलीस विभाग व पर्यावरण विभाग यांची संयुक्त समिती तयार करून रेती माफियांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा यावेळी गृहमंत्री यांनी दिले.