Published On : Thu, Aug 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात युवकांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीचा एल्गार; तिरंगा मोटरसायकल मोर्चातून सरकारला इशारा

Advertisement

नागपुरात युवकांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीचा एल्गार; तिरंगा मोटरसायकल मोर्चातून सरकारला इशारा

नागपूर : बेरोजगारी, सरकारी भरतीतील पेपरफुटी आणि वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने नागपुरात तिरंगा दुचाकी मोर्चा काढत सरकारचे लक्ष वेधले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात युवकांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संविधान चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. सरकारी आणि निमसरकारी विभागांतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, भरती प्रक्रिया पारदर्शक करावी आणि पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. पेट्रोल, डिझेल, साखर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याची मागणीही करण्यात आली.

मात्र, आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते विनाहेल्मेट दुचाकी चालवताना दिसल्याने वेगळाच मुद्दा चर्चेत आला. याबाबत काही नेत्यांनी पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देताना हेल्मेटसंदर्भात सूचना देणे अपेक्षित असल्याचे सांगत भूमिका मांडली. मात्र, अनिल देशमुख यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट भाष्य करणे टाळले.

युवकांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या शहर नेतृत्वाकडून देण्यात आला. आता विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या कार्यकर्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते का, याकडेही लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.