Published On : Thu, Jun 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अग्निशमन विभागाची कारवाई; फायर सेफ्टी नियमांचे उल्लंघन केल्याने नॅनकिंग्स रेस्टॉरंट सील

Advertisement

नागपूर : शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरात अग्निशमन विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारी मोठी कारवाई करत प्रसिद्ध नॅनकिंग्स रेस्टॉरंटसह त्याच इमारतीतील कार्यालयांना सील ठोकले. फायर सेफ्टी नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरातून 50 हून अधिक गॅस सिलिंडरही जप्त करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आस्थापनाला अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी सहापेक्षा अधिक वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, वारंवार सूचना देऊनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊल उचलत संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला.

Gold Rate
July 28 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,900 /-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,18,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुरुवारी अग्निशमन विभाग आणि नागपूर महानगरपालिकेच्या सुमारे दहा पथकांनी एकत्रितपणे संपूर्ण इमारतीची तपासणी केली. तपासणीत अग्निसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळून आल्या. विशेषतः मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर असुरक्षितरीत्या साठवून ठेवण्यात आल्याचे समोर आले.

कारवाईदरम्यान 50 हून अधिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, या सिलिंडरमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला होता. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने संपूर्ण रेस्टॉरंट आणि संबंधित इमारत सील केली.

Advertisement

अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे की, फायर सेफ्टी नियमांचे पालन न करणाऱ्या इतर व्यावसायिक आस्थापनांविरोधातही आगामी काळात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील. त्यामुळे शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांनी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

बच्चियों से छेड़छाड़ करने वालों को फाँसी तक की सजा मिलनी चाहिए।

बच्चियों से छेड़छाड़ करने वालों को फाँसी तक की सजा मिलनी चाहिए।

पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज

पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज

विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग

विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges